मध्यच्या सर्वांगीण विकासासाठी एम.एम. शेख यांनाच विजयी करा

By Admin | Updated: October 8, 2014 01:04 IST2014-10-08T01:00:07+5:302014-10-08T01:04:07+5:30

औरंगाबाद : सर्वांगीण विकास करायचा असेल, तर शेख यांच्याशिवाय पर्याय नाही, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.

MM for overall development of the middle Winning Sheikh only | मध्यच्या सर्वांगीण विकासासाठी एम.एम. शेख यांनाच विजयी करा

मध्यच्या सर्वांगीण विकासासाठी एम.एम. शेख यांनाच विजयी करा

औरंगाबाद : एम.एम. शेख हे स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व असून, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. औरंगाबाद मध्य विधाानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर शेख यांच्याशिवाय पर्याय नाही, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला. एन-९ एच सेक्टर येथील कॉर्नर सभेत राजेंद्र दर्डा यांनी एम.एम. शेख यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे मध्यचे उमेदवार एम.एम. शेख यांच्या प्रचारार्थ राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी प्रचार रॅली काढण्यात आली. दरम्यान, कॉर्नर सभेत राजेंद्र दर्डा यांनी नागरिकांशी संवाद साधला. एम.एम. शेख यांच्याविषयी बोलताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, शेख यांनी नेहमीच औरंगाबादच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या भागाचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याचे काम ते नेहमीच करीत आले आहेत. औरंगाबादच्या मध्य विधानसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणायचा असेल, तर शेख यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनी
केले.
शेख आपल्या भाषणात म्हणाले की, औरंगाबाद मध्य मतदारसंघाच्या विकासाचा योजनाबद्ध आराखडा माझ्याकडे तयार आहे. सध्या चार दिवसांनी येणारे पाणी दिवसाआड सुरू करीन, लीजवर असलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लावेन आणि औरंगाबादला सुसज्ज महानगर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शेख यांनी दिले. याप्रसंगी माजी महापौर सुदाम सोनवणे यांचेदेखील भाषण झााले.
प्रचार रॅलीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीची सुरुवात आंबेडकर चौकातून झाली. रॅलीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. शिवनेरी कॉलनी, रायगडनगर, प्रतापनगर, शिवाजीनगर, पवननगर, नेताजी सुभाषचंद्र बोसनगर, एन-९ एच-सेक्टर भागात रॅली काढण्यात आलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील गल्लीत रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. इक्बालसिंग, अविनाश अंभोरे, प्रभाकर मुठ्ठे पाटील, दाते पाटील, योगेश हिवाळे, संजय कोल्हे, भरत निंभोरे, प्रमोद देशमुख यांच्यासह, काँग्रेसचे पदाधिकारी, नगररसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: MM for overall development of the middle Winning Sheikh only