औरंगाबाद : येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाने आऊटलूक मासिकाने घेतलेल्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये देशात ७३ वा तर राज्यात १५ वा क्रमांक मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. एमआयटी महाविद्यालयाने या रँकिंगमध्ये मराठवाड्यात पहिला क्रमांक प्राप्त केल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले की, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सर्वोत्कृष्टता, व्यक्तिमत्त्व विकास, औद्योगिक सुसंवाद तसेच पायाभूत सुविधा आणि प्लेसमेंट हे पाच मापदंड या सर्वेक्षणात वापरण्यात आले. यामध्ये आयआयटी दिल्लीने पहिला क्रमांक मिळविला. तर राज्यात मुंबई आयआयटीला पहिले स्थान मिळाले. एमआयटी आणि औद्योगिक जगताचा चांगला सुसंवाद असल्याने तसेच देशी- विदेशी कंपन्यांशी सहकार्य असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळते. देशात पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळण्यास संस्थेचे व्यवस्थापन, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा मोठा वाटा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी एमआयटी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य एस. जी. देशमुख उपस्थित होते.
एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात ७३ वे
By admin | Updated: July 10, 2016 01:03 IST
औरंगाबाद :एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आऊटलूक मासिकाने घेतलेल्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये देशात ७३ वा तर राज्यात १५ वा क्रमांक मिळविल्याची माहिती दिली.
एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात ७३ वे
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}