Mission Admission: 'कृषी' प्रवेशासाठी २७ हजार विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

By योगेश पायघन | Published: October 13, 2022 08:23 PM2022-10-13T20:23:24+5:302022-10-13T20:24:05+5:30

१७ ऑक्टोबर रोजी होईल पहिल्या फेरीसाठी जागा वाटप

Mission Admission: The final merit list of 27 thousand students for agriculture degree admission has been announced | Mission Admission: 'कृषी' प्रवेशासाठी २७ हजार विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

Mission Admission: 'कृषी' प्रवेशासाठी २७ हजार विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

googlenewsNext

औरंगाबाद : कृषी आणि संलग्न कृषी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. राज्यात नऊ अभ्यासक्रमांसाठी अनुदानित ३,३८०, विनाअनुदानित १३,२४० जागांसाठी २८ हजार २८० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११२५ जणांचे आक्षेप नाकारण्यात आले. तर अंतिम गुणवत्ता यादीत २७ हजार १६७ विद्यार्थ्यांच्या जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फेरीसाठी जागा वाटप १७ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. त्यासाठी रिपोर्टिंगचा कालावधी १८ ते २० ऑक्टोबर असेल.

सुधारीत वेळापत्रकानुसार, दुसऱ्या फेरीचे जागा वाटप २३ ऑक्टोबर रोजी, रिपोर्टिंग २७ ते २९ ऑक्टोबर, तिसऱ्या फेरीचे जागा वाटप ३ नोव्हेंबर, रिपोर्टिंग कालावधी ४ ते ८ नोव्हेंबर असेल. ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीत जागा निश्चिती झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान उपस्थित राहून कागदपत्रे, आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीतील गुणवत्तेनुसार १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान प्रवेश फेरी होईल. दरम्यान, १४ नोव्हेंबर पासून नियमित वर्ग शिकवणीला सुरूवात होईल.

७,३१५ आक्षेपांचे निराकरण
ऑनलाइन आक्षेपासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. त्यात ८ हजार ४४२ आक्षेप सीईटी सेलकडे दाखल झाले होते. त्यापैकी ७,३१५ आक्षेपांचे निराकरण करण्यात आले. तर तर ११२५ आक्षेप नाकारण्यात आले. ती यादीही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

अनुदानित ३,३८०, विनाअनुदानित १३,२४० जागा
राज्यात नऊ अभ्यासक्रमांच्या ३३८० अनुदानित जागा आहेत, तर विनाअनुदानित सहा अभ्यासक्रमांच्या १३ हजार २४० जागा आहेत. चार कृषी विद्यापीठ अंतर्गत ही महाविद्यालये कार्यरत आहेत. सर्वाधिक ७४ महाविद्यालयात बी. एस्सी. ऑनर्स कृषी या अभ्यासक्रमाच्या ७,८९० जागा ७४ महाविद्यालयात आहेत. तर बी. टेक. जैवतंत्रज्ञान १६ काॅलेजमध्ये १२५० जागा, बी. टेक. अन्नशास्त्र २४ काॅलेजमध्ये १४८० जागा असून १० काॅलेजमध्ये बी.एस्सी. उद्यान विद्याच्या ८४० जागा, बी. एस्सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या १२ महाविद्यालयांत ९०० जागा आहेत. बी. टेक. कृषी अभियांत्रिकीच्या १५ महाविद्यालयांत ८८० जागा आहेत.

अभ्यासक्रमनिहाय अनुदानित जागा
अभ्यासक्रम - महाविद्यालय - जागा
बी. एस्सी. (ऑनर्स कृषी) - २२ - २२४८
बी. एस्सी. (ऑनर्स उद्यान विद्या) - ६ - ३३२
बी. एस्सी. (ऑनर्स वनशास्त्र) - २ - ८२
बी. एस्सी. (ऑनर्स समुदाय विज्ञान) - १ - ६०
बी. एस्सी. (ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन) - १ - ६०
बीएफसी (फिशरी सायन्स) - १ - ४०
बी. टेक. (अन्नशास्त्र) - ३ - १६०
बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) - ५ - ३०४
बी. टेक. (जैव तंत्रज्ञान) - २ - १००

Web Title: Mission Admission: The final merit list of 27 thousand students for agriculture degree admission has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.