किरकोळ कारणावरुन दोघांची कारचालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:16 IST2019-07-27T23:16:08+5:302019-07-27T23:16:20+5:30

हॉर्न का वाजविला या किरकोळ कारणावरुन कार चालकाला दोन दुचकीस्वारांनी मारहाण केली.

Minor man beaten by driver for minor reasons | किरकोळ कारणावरुन दोघांची कारचालकाला मारहाण

किरकोळ कारणावरुन दोघांची कारचालकाला मारहाण

वाळूज महानगर : हॉर्न का वाजविला या किरकोळ कारणावरुन कार चालकाला दोन दुचकीस्वारांनी मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरुध्द शनिवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राहुल सुरडकर (३१ रा.बजाजनगर) हा शुक्रवार दुपारी १ वाजेच्या सुमारास कारने (एम.एच.२०, ई.वाय.७५०५) बजाजनगरातून घराकडे चालला होता. या मार्गावरील गोरख वाघ चौकाजवळ एक दुचाकी अचानक समोर आल्याने कारचालक राहुलने हॉर्न वाजविला. यामुळे संतप्त झालेल्या त्या दोघांनी कारसमोर दुचाकी उभी करुन कारचालक राहुलला शिवीगाळ करुन मारहाण केली.

दुचाकीस्वार तरुणांची नावे शुभम जाधव व दिनेश आदीक असल्याचे जखमी कारचालक राहुलला परिसरातील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी राहुल सुरडकर याच्या तक्रारीवरुन शुभम जाधव व दिनेश आदीक याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor man beaten by driver for minor reasons