शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे आश्वासन २ वर्षांचे, प्रतिनियुक्ती महिन्याची

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद :तीन महिन्यांच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या मूत्ररोगतज्ज्ञाला दोन वर्षांची प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना दिले होते.

औरंगाबाद : रुग्णांची गरज ओळखून तीन महिन्यांच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या मूत्ररोगतज्ज्ञाला दोन दिवसांत दोन वर्षांची प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना दिले होते. आव्हाड यांचा दौरा संपताच वैद्यकीय शिक्षण संचालकांनी त्यांच्या आदेशाला गुंडाळून या तज्ज्ञाला केवळ एक महिन्याची प्रतिनियुक्ती दिल्याचे उघड झाले आहे.मूतखडा आणि मूत्ररोगासंबंधी घाटीत रोज २० ते २५ रुग्ण दाखल होतात. यापैकी अनेकांवर शस्त्रक्रिया करावी लागते. येथील रुग्णांची गरज लक्षात घेऊन अधिष्ठातांनी केलेल्या मागणीनंतर एक वर्षापूर्वी डॉ. व्यंकट गिते या मूत्ररोगतज्ज्ञाला मुंबईतील जे.जे. रुग्णालयातून घाटीत प्रतिनियुक्ती देण्यात आली. वर्षभरापासून डॉ. गिते यांना तीन महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती देण्यात येते. दर तीन महिन्यांनंतर डॉ. गिते आणि घाटी प्रशासनाला कागदी घोडे नाचवावे लागतात. त्यानंतर त्यांना प्रतिनियुक्ती मिळते. हा प्रकार वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे घाटीच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आणून देण्यात आला. त्यावेळी आव्हाड यांनी मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. गिते यांना दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती देतो, असे आश्वासन दिले आणि सोबत असलेल्या वैद्यकीय संचालकांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले. या आदेशाला संचालकांनी केराची टोपली दाखवत डॉ. गिते यांना १ ते ३१ जुलै या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती दिली.प्रस्तावास टाळाटाळदोन वर्षे प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकार शासनाला आहेत. याबाबत मंत्र्यांच्या आदेशाने वैद्यकीय शिक्षण संचालकांनी याविषयीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्याकडूनही प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गिते यांच्या प्रतिनियुक्तीसंदर्भात ३१ जुलैपूर्वी निर्णय न झाल्यास रुग्णांना उपचारासाठी वाट बघावी लागेल.