शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत उद्योगांना घरघर

By admin | Updated: September 21, 2014 00:25 IST

विजय मुंडे ,उस्मानाबाद शहरानजीक असलेल्या ‘एमआयडीसी’त मुलभूत सुविधांचा अभाव अभाव आहे़ त्यातच उद्योजकांचे अर्धे श्रम महामंडळाच्या किचकट नियमांची अंमलबजावणी करण्यात जात असून,

विजय मुंडे ,उस्मानाबादशहरानजीक असलेल्या ‘एमआयडीसी’त मुलभूत सुविधांचा अभाव अभाव आहे़ त्यातच उद्योजकांचे अर्धे श्रम महामंडळाच्या किचकट नियमांची अंमलबजावणी करण्यात जात असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी बैठकही वेळेवर होत नसल्याने उद्योजकांचे प्रश्न जैसे थेच आहेत़महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्वप्रथम उस्मानाबाद शहरानजीक १०१़९६ हेक्टर जागा संपादीत करून उद्योजकांना भूखंडाचे वाटप केले़ तर कौडगाव परिसरात तीन अतिरिक्त उस्मानाबाद एमआयडीसीसाठी ५५़५२ हे़, टप्पा दोनचे काम व तिसऱ्या टप्प्यात ३६९़४३ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे़ शहरानजीकच्या एमआयडीसीत प्रारंभी अनेकांनी भूखंड घेवून उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न केले़ मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या किचकट नियमामुळे अनेकांनी त्यावेळीच उद्योगापासून फारकत घेतली़ गत काही वर्षात विकण्यात आलेल्या भूखंडाचे बांधकामही नियमांच्या कचाट्यात सापडल्याने अनेकांचे कारखाने अद्यापही उभा राहू शकलेले नाहीत़ सद्यस्थितीत उस्मानाबाद येथील एमआयडीसीत केवळ बोटावर मोजण्याइतके उद्योग सुरू आहेत़ विशेष म्हणजे रस्ता, पाणी, वीज या प्रमुख सुविधांचा अभाव कायम असून, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केवळ दोन कुपनलिका आहेत़ एमआयडीसीची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असली तरी ती केव्हा पूर्ण होणार ? हा प्रश्न कायम आहे़ त्यामुळे बारामहिने उद्योजकांना विकत पाणी घेवून उद्योग चालवावा लागत आहे़ महामंडळाच्या किचकट नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन-तीन महिन्याला एक बैठक होणे अपेक्षित असते़ मात्र ही बैठकही वेळेवर होत नसल्याने उद्योजकांचे प्रश्न शासनस्तरावर पोहचू शकत नाहीत़ उद्योग सुरू करण्यासाठी असलेली आॅनलाईन नोंदणीही अनेक वर्षापासून बंद आहे़ शिवाय उद्योजकांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री होण्यासारखी मोठी बाजारपेठ उस्मानाबादेत नाही़ लातूर, सोलापूरसह पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहून येथील उद्योजकांच्या उत्पादीत मालाला अपेक्षित मागणीही मिळत नाही़ हाताला काम मिळत नसल्याने मोठ्या शहराकडे जाणाऱ्या युवकांची संख्या मात्र, दिवसेंदिवस वाढतच आहे़ एकूणच एमआयडीसीतील उद्योजकांसमोरील अडचणींचा डोंगर पाहता राजकीय नेतेमंडळींनी निवडणूक कालावधीत एमआयडीसीच्या भरभराटीसाठी आवश्यक मुद्दे, आराखडा तयार करून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे़येथे मुलभूत सुविधांचा अभाव तर आहे़ त्यातही पाण्याचा प्रश्न गंभीर असून, अनेकवेळा विकत पाणी घेवून उद्योगाची गरज भागवावी लागत आहे़ शिवाय एमआयडीसीत एखादा मोठा कारखाना सुरू झाला तर इतर लहान नवीन कारखनेही सुरू होतील़ पर्यायाने युवकांच्या हातालाही चांगले काम मिळेल, असे उद्योजक प्रकाश खांदारे यांनी सांगितले़स्वतंत्र कार्यालयाची गरज४औद्योगिक महामंडळाचे नियम मोठे किचकट आहेत़ या नियमांची अंमलबजावणी करताना उद्योजकांच्या नाकी नऊ येतात़ शिवाय कार्यालय लातूर येथे असल्याने व वरिष्ठ कार्यालये औरंगाबाद, मुंबई येथे असल्याने उद्योजकांना मोठी कसरत करीत हे कार्यालये गाठावी लागतात़ उद्योजकांचे प्रश्न जिल्ह्यातच मिटावेत यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय उभारण्याची गरज उद्योजक एस़आरख़ंटीग यांनी व्यक्त केली़येथील ‘एमआयडीसी’तील उद्योजकांसमोर विजेचा प्रश्न कायम आहे़ शिवाय नवीन कनेक्शनही वेळेवर देण्यात येत नाही़ कुणाकडे जायचा असा प्रश्न आता उपस्थित होतो़ शिवाय उद्योगासमोरील अडचणी, प्रश्न व शासकीय, महामंडळाचे काम पूर्ण करण्यासाठी इतर शहरात जावे लागते़ त्यामुळे एमआयडीसीतच ‘एक खिडकी योजना’ होण्याची गरज असल्याचे उद्योजक संतोष शेटे यांनी सांगितले़