शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

मेटे म्हणाले, स्व. मुंडे यांच्यानंतर फडणवीसच...

By admin | Updated: September 4, 2015 00:17 IST

! बीड : स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, असा पलटवार आ. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यासमोर करून

!बीड : स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, असा पलटवार आ. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यासमोर करून पालकमंत्री पंकजा मुंडे विरूध्द आ. मेटे या वादाला मुख्यमंत्र्यांसमोरच तोंड फोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केल्याचे प्रत्ययास आले. यावेळी आ. मेटे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेत्तृत्वाला बगल देत म्हटले की, जिल्हयातील जनता स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्यानंतर विकासाच्या अपेक्षेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघते आहे. विदर्भाच्या धरतीवर मराठवाडा व बीड जिल्हयाचा विकास होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आहे असा टोला आ. मेटे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावल्याने पंकजा मुंडे यांच्या नेत्तृत्वाला त्यांचा विरोध असल्याच्या छुप्या चर्चेला मुख्यमंत्र्यांसमोरच दुजोरा मिळाला.यावर पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणातून मुख्यमंत्री विदर्भातील आहेत आणि मी मराठवाड्यातील आहे. आम्ही दोघांनीही दुष्काळ जवळून पाहिला आहे. त्यामुळे आम्ही तळमळीने काम करत आहोत, असे सांगत आपणच मराठवाड्याचे नेतृत्व करत असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.गेली काही दिवसांपासून मुंडे आणि मेटे यांच्यातील दुरावा वाढत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. रेल्वेचा प्रश्न घेऊन रेल्वेमंत्र्यांना मेटे एकटेच भेटायला गेल्यानंतर त्यांच्यातील दुराव्याची चर्चा जाहीरपणाने होऊ लागली होती. दुष्काळाची पहाणी करण्यासाठी बीड जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीड तालुक्यातील पालवण येथील यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचे उदघाटन करण्यात आले. सकाळी ८:३० वाजता मुख्यमंत्र्याचे पालवण येथे आगमन झाले.पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आ. संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे. आ. विनायक मेटे, शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष दिलीप गोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सलीम जहाँगीर, अशोक लोढा, गणेश वरेकर, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)