शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाला जल्लोषात निरोप

By admin | Updated: September 10, 2014 00:53 IST

औरंगाबाद : पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वादा करून वरुणराजाच्या साक्षीने गणाधिपतीला सोमवारी निरोप देण्यात आला.

औरंगाबाद : पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वादा करून वरुणराजाच्या साक्षीने गणाधिपतीला सोमवारी निरोप देण्यात आला. पावसाची रिमझिम, ढोल-ताशांचा दणदणाट, बँडपथकाच्या धूनवर थिरकणारी तरुणाई, चित्तथरारक मर्दानी खेळ, असे अमाप उत्साहाचे ११ तास औरंगाबादकरांनी अनुभवले. जुन्या शहरासोबतच सिडको-हडको, गारखेडा, मुकुंदवाडी परिसरातील ‘श्री’ विसर्जन मिरवणूक जल्लोषात, शिस्तीत व शांततेत पार पडली. दुपारी १ वाजता सुरू झालेला असंख्य वाद्यांचा दणदणाट रात्री १२ वाजता बंद झाला. महाराष्ट्राचे लाडके दैवत गणाधिपतीने वर्षभरासाठी निरोप घेताना दुष्काळाचे विघ्नही दूर केले. यामुळे सोमवारी विसर्जन मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली तेव्हा साऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. भर पावसात मिरवणुकी काढण्यात आल्या. तरुण, ज्येष्ठ मंडळींसोबतच तरुणी, महिला व चिमुकल्यांचा सहभागही वाखाणण्याजोगा ठरला. सावरकर चौकातील गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयात श्रींची आरती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाली. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष प्रमोद राठोड, महासंघाचे सर्व पदाधिकारी हजर होते. रिमझिम पाऊस सुरू असतानाच ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात खा.चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, किशनचंद तनवाणी, प्रकाश मुगदिया, सुभाषचंद चोरडिया, प्रफुल्ल मालाणी, गोपी घोडेले आदींची उपस्थिती होती. ग्रामदैवताची आरती होताच मुख्य मिरवणुकीला भर पावसात दुपारी १ वाजता सुरुवात झाली. संस्थान गणपतीची प्रतिकृती बैलगाडीच्या रथात ठेवण्यात आली होती. रथाला पुष्पहाराने सजविण्यात आले होते. चाळीसगावहून आलेल्या बँडपथकाने सुरुवातीला गणपतीची आरती व नंतर देशभक्तीपर गीताची धून वाजविली. यापाठोपाठ गणेश महासंघ उत्सव समितीच्या वाहनात ‘श्री’ची मूर्ती आणण्यात आली होती. या वाहनाला समोरील बाजूस फायबरचे अश्व लावण्यात आले होते. मिरवणुकीत सर्वप्रथम सहभागी होण्याचा मान जाधवमंडी येथील अष्टविनायक गणेश मंडळाने पटकाविला. लालबाग राजाची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती. रिमझिम सुरू असतानाही उत्साह मात्र कमी झाला नव्हता. यानंतर विविध भागांतून सार्वजनिक गणेश मंडळांचे आगमन होत राहिले. जम्बो ढोलपथकासोबत लेझीम, पावली, झांज पथक घेऊन गणेश मंडळांनी मिरवणुकीत रंगत आणली. शहागंज, सराफा रोड, गांधी चौक, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे जिल्हा परिषद मैदानावर मिरवणूक पोहोचत होती. आरती करून मूर्तीचे विसर्जन केले जात होते.