शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘महफिल-ए-विदा’ने उरुसाचा समारोप

By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST

औरंगाबाद : शहागंज येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मागील चार दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद : शहागंज येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मागील चार दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी ‘महफिल- ए- विदा’ने उरुसाचा समारोप करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंगळवारी दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्ग्यामध्ये महिलांना दर्शनासाठी संधी देण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.शनिवारी सायंकाळी खडकेश्वर येथून संदल मिरवणूक काढण्यात आली होती. दर्गा शाह शरीफ साहब येथेही ‘महफील- ए- समां’चे आयोजन करण्यात आले होते. संदल मिरवणूक झाल्यावर हजरत सय्यद निजामोद्दीन औलिया दर्ग्यामध्येही ‘महफील- ए- मिलाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पहाटे ३ वाजता ‘महफील- ए- समां’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘संदल माली’, ‘चिराग- ए- गुल’, ‘फातेहा’ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाविक मोठ्या श्रद्धेने या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. सकाळी ‘फज्र’च्या नमाजनंतर पवित्र ‘कुराण’ पठण कार्यक्रम घेण्यात आला. रात्री ९.३० वाजता दर्गा परिसरात कव्वालीचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी जयपूरचे टिम्मू गुलफाम आणि हैदराबाद येथील तहसीन हुसैन यांनी एकापेक्षा एक सरस कव्वाली सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. सोमवारी सायंकाळीही कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर ७ वाजता ‘चिरांगा’ कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सज्जादा नशीन सय्यद मोईनोद्दीन ऊर्फ मोहंमदमियाँ फकरी, प्रबंधक सय्यदा नैयरजहाँ बेगम, अ‍ॅड. महबूबमियाँ निजामी आदींनी आभार मानले.