शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव तालुक्यात पीककर्जासाठी मेळावे

By admin | Updated: June 25, 2017 23:39 IST

सेनगाव : शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी पीककर्ज मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून सेनगाव तालुक्यातील व्यापारी बँकाच्या आठ शाखांमध्ये पीककर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत. पीककर्ज वाटप अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सुलभ व सहजतेने पीक कर्ज मिळावे, यासाठी सेनगाव तहसील कार्यालयात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील स्टेट बँक इंडिया, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी तीन बँकांच्या आठ शाखांच्या शाखेंच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.दरम्यान, यावेळी बैठकीत शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करण्याच्या अनुषंगाने कर्ज मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. तालुक्यातील मध्यवर्ती बँक शाखा वगळता अन्य व्यापारी बँकांमध्ये पीककर्ज मेळाव्याचे आयोजन गावनिहाय करण्यात आले आहे. या अनुषंगाने २८ जून रोजी सेनगाव येथील भारतीय स्टेट बँकेत मेळावा होणार आहे. तर ३ जुलै रोजी गोरेगाव येथील स्टेट बँक इंडिया, १३ जुलै रोजी सेनगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखा तसेच १४ जुलै रोजी पानकनेरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक, १८ जुलै रोजी सेनगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा, २१ जुलै रोजी आजेगाव तर २२ जुलै रोजी पुसेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळाव्यात नियमीत खातेदारांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून मेळाव्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.