शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या मापात पाप

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे. हे पाण्याच्या मापात पाप असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनीच सुरू केला आहे.दोन दिवसांआड पाणीपुरवठा करायचा आणि त्यातही १५ मिनिटांची दांडी मारायची असा नित्यक्रम दोन महिन्यांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. नवीन जलवाहिनीची बंद असलेली कामे आणि पाण्याचा तुटवडा यातून मार्ग काढण्यात पालिका प्रशासन आणि पदाधिकारीदेखील असमर्थ ठरत असल्याचे दिसते आहे. आगामी काळात नागरिकांचा उठाव होऊन मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन जलवाहिनीची कामे बंद आहेत. मुख्य जलवाहिनीचे काम अजून कंपनीने सुरू केलेले नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पाणीपुरवठा सुरू होतो, तेव्हा कंपनीचा कुठलाही कर्मचारी पाणीपुरवठा होतो किंवा नाही याचा आढावा घेत नाही. पाण्याचा दाब, शेवटच्या घरापर्यंत पोहोचते की नाही, शिवाय, कंपनीने कुठलीही पाहणी न करताच यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे. कंपनी मनपाची जावई आहे का?उपमहापौर संजय जोशी म्हणाले अभियंते बटीक झाले आहेत. कंपनी मनपाची जावई आहे, अशा थाटात अधिकारी कंपनीची खातरदारी करीत आहेत. कंपनीकडे काहीही डेटा व नियोजन नाही. शहराला योजनेतून काहीही फायदा मिळालेला नाही. योजनेतून शून्य आऊटपूट असून १ लिटरही जास्तीचा पाणीपुरवठा वाढलेला नाही. १दूषित पाणीपुरवठा अजूनही सुरू आहे. काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतो आहे. त्याचा शोध कंपनीने बंद केला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर कोण जबाबदार, असा सवाल आहे. २१० नोव्हेंबरपासून दूषित व गढूळ पाण्याची ओरड सुरू आहे, तर दुसरीकडे ३ हजार ५० रुपयांची पाणीपट्टी बिलाच्या नोटीसचा भडिमार कंपनीने सुरू केला आहे.३ काही नागरिकांनी एप्रिलमध्ये पाणीपट्टी भरलेली आहे. असे असतानाही त्यांना पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. याचा अर्थ कंपनीकडे नळधारकांचा कुठलाही लेखाजोखा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.४समांतर जलवाहिनीच्या कंत्राटासाठी केलेले करार समजून घेण्यासाठी होणारी विशेष सभा लांबणीवर पडणार आहे. महापौर कला ओझा यांच्या घरी मंगल कार्य आहे. त्यामुळे विशेष सभा १० डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. ४तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात योजनेचा करार झाला, तर तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या काळात मनपाची पाणीपुरवठा हस्तांतरित करण्यात आली.