शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्राध्यापकांच्या नेहमीच्या उसनवारीला एमसीआयकडून चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 00:11 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) इन्स्पेक्शन कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वैैद्यकीय शिक्षकांची उसनवारीवर बदली करून

बापू सोळुंके , औरंगाबाद मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) इन्स्पेक्शन कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वैैद्यकीय शिक्षकांची उसनवारीवर बदली करून नियुक्ती दाखविण्याच्या प्रकाराला आता कायमस्वरूपी चाप बसणार आहे. एमसीआयने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांना त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची माहिती एमसीआयच्या संकेतस्थळावर दोन दिवसांत अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या माहितीमुळे प्राध्यापकांची हेराफेरी कायमस्वरूपी रोखली जाणार आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून देशातील शासकीय वैैद्यकीय महाविद्यालय आणि खाजगी वैैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली जाते. एमसीआयच्या मान्यतेनेच ही वैैद्यकीय महाविद्यालये सुरू असतात. महाराष्ट्रात १४ शासकीय वैैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. शिवाय खाजगी वैैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तेवढीच आहे. एमसीआयने महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांच्या पदसंख्येबाबत निकष घालून दिलेले आहेत. एमसीआयच्या निकषानुसार वैैद्यकीय शिक्षकाची पदे भरलेली नसेल तर त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द होऊ शकते अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता काढली जाते. त्यामुळे एमसीआयच्या इन्स्पेक्शनप्रसंगी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून वैैद्यकीय शिक्षकांची पदे भरण्यात आलेली असल्याचे दाखविले जाते. राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयांपैैकी दरवर्षी दोन किंवा तीन महाविद्यालयांची दरवर्षी एमसीआयकडून तपासणी होत असते. त्या महाविद्यालयातील रिक्त पदावर अन्य शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या उसनवारीवर बदल्या केल्या जातात. केवळ एमसीआय इन्स्पेक्शनपुरत्या या बदल्या करून त्याची नियुक्ती त्या महाविद्यालयात दाखविण्यात येते. एमसीआयचे पथक तपासणी करून रवाना होताच पुन्हा त्यांना परत पाठविले जाते. प्राध्यापकांची हेराफेरी थांबविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (पान ४ वर) वैद्यकीय संचालकांच्या आदेशानुसार आम्ही एमसीआयच्या संकेतस्थळावर वैद्यकीय शिक्षकांची माहिती अपलोड केली आहे. यामुळे आता एमसीआयच्या इन्स्पेक्शनपुरत्या प्राध्यापकांच्या उसनवारीवर होणाऱ्या बदल्या टळतील. शिवाय प्राध्यापकांची रिक्त पदेही भरण्यात येतील. डॉ. सुहास जेवळीकर, अधीक्षक, घाटी रुग्णालय