शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य, बी-बियाणे बाजारात उलाढाल ठप्प; साऱ्यांचे डोळे आभाळाकडे!

By admin | Updated: June 16, 2016 00:13 IST

औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवस उलटले पण अजूनही आकाशात काळे ढग दिसले नाहीत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू होऊन सात दिवस उलटले पण अजूनही आकाशात काळे ढग दिसले नाहीत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा हवामान खात्याने वेळेआधीच जोरदार पाऊस येणार, अशी भविष्यवाणी केली होती. त्या विश्वासावर शेतकऱ्यांनी धूळपेरण्या केल्या पण पहिली भविष्यवाणी खोटी ठरली आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील शिल्लक धान्य विक्रीस आणणे थांबविले आहे तसेच बी-बियाणे खरेदीसाठी ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण स्वीकारल्याने बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. हवामान खात्याने यंदा मृगनक्षत्राआधीच मान्सूनला सुरुवात होईल, असे भाकीत केले होते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. फुलंब्री ते सिल्लोड या पट्ट्यात अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी करून टाकली. तसेच पाचोड, विहामांडवा इ. भागात अवकाळी पाऊस पडल्याने तेथील काही भागांत पेरणी झाली आहे. अन्य तालुक्यात मात्र, १० ते २० टक्केच पेरणी झाली आहे. मृग नक्षत्राला ७ जून रोजी सुरुवात होते. मात्र, यंदा हवामान खात्याचा पहिला अंदाज पावसाने खोटा ठरविला व सात दिवस होऊनही मान्सून न बरसल्याने ज्या शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीत हात आखडता घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून बी-बियाणे विक्रेत्यांच्या दुकानात शुकशुकाट जाणवत आहे. काही दुकानात तर बियाणांचे एक पाकीटही विक्री झाले नाही. अशीच परिस्थिती जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारातही आहे. शेतकरी आपल्याकडील शिल्लक धान्य विक्री करून त्या रकमेतून बी-बियाणे, खत खरेदी करतात. पण त्वरित पावसाची शक्यता दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस आणणे थांबविले आहे. अतिअडचणीत असलेले शेतकरी गहू, ज्वारी, बाजरी विक्रीसाठी आणत आहेत. धान्य अडत बाजारातील आवक एवढी कमालीची घटली असून जिथे मागील वर्षी जून महिन्यात दररोज ३०० ते ४०० पोते आवक होत असे, तिथे सध्या १०० ते १५० पोतीच आवक होत आहे. वार्षिक धान्य खरेदी संपल्याने आता ग्राहकांनीही धान्य बाजाराकडे पाठ फिरविली आहे.