शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अनेक विभागांत यंदा विद्यार्थी संख्या कमी...

By admin | Updated: July 12, 2016 01:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत. यामुळे विद्यापीठात उत्तम दर्जाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्ष़ा असताना विद्यार्थ्यांची संख्याच रोडावल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील मानव्य इमारतीमध्ये असलेल्या अनेक विभागांत विद्यार्थ्यांचा दुष्काळ असल्याची परिस्थिती आहे. तर विज्ञान विभागांमध्येही चार ते पाच विभाग सोडले तर विद्यार्थी संख्या कमीच आहे. विज्ञान विभागापेक्षा कला आणि सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमांची स्थिती बिकट असल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार विद्यापीठातील भाषा विभागांत मराठी, हिंदी या विभागांत पहिल्या वर्षीच्या पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत या दोन विभागांत संपूर्ण जागा भरल्या जात नाहीत. मराठी विभागात एम. ए. प्रथम वर्षासाठी यंदा सुमारे ६० पैकी ३५ जागा भरल्या गेल्या आहेत. हिंदी आणि संस्कृत विभागांतही हीच स्थिती आहे. सामाजिकशास्त्रे विभागांतील लोकप्रशासन विभागात ७० पैकी १६ जागा भरल्या गेल्या आहेत. शिक्षणशास्त्र विभागात ५० पैकी ३० जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र, या विभागात गेल्या वर्षीपेक्षा प्रतिसाद चांगला आहे. इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आदी विभागांत पटसंख्येपेक्ष़ा कितीतरी विद्यार्थी कमी असल्याचे दिसते. विज्ञान विभागात पर्यावरणशास्त्र विभागात प्रथम वर्षाच्या ३२ पैकी जागा भरल्या गेल्या आहेत. प्राणिशास्त्र विभागात ७० पैकी ५२ जागा भरल्या गेल्या आहेत. जैवरसायनशास्त्र विभागात २२ पैकी १८ जागा भरल्या गेल्या आहेत. संगणकशास्त्र विभागातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सला ३२ जागा असून, सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र एम. एस्सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात ३२ पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या आहेत. या अभ्यासक्रमाची फी अधिक असल्याने तेथे पटसंख्या रिक्त राहते. तेथे आणखी चार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा या विभागाला प्रतिसाद चांगला आहे. गणितशास्त्र आणि संख्याशास्त्र विभागातही उत्तम प्रतिसाद नाही. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रवेश तंत्रशिक्षण विभागातर्फे केले जातात. त्यामुळे अद्याप प्रवेशप्रक्रिया चालू आहे.