मनपात ‘केरळ’ची निविदा उघडलीच नाही

By Admin | Updated: December 8, 2015 00:06 IST2015-12-07T23:37:18+5:302015-12-08T00:06:01+5:30

लातूर : नगसेवकांच्या केरळ दौऱ्याला विरोध वाढत असतानाही मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे़ पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा बनलेला हा दौरा

Mandal did not open the tender for Kerala | मनपात ‘केरळ’ची निविदा उघडलीच नाही

मनपात ‘केरळ’ची निविदा उघडलीच नाही


लातूर : नगसेवकांच्या केरळ दौऱ्याला विरोध वाढत असतानाही मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे़ पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा बनलेला हा दौरा करण्यासाठी प्रशासनाने आॅनलाईन निविदा मागविल्या होत्या़ ७ डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार होत्या़ मात्र, केवळ दोनच निविदा आल्याने ती उघडण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ वरिष्ठांच्या आदेशानुसार परत निविदा मागविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे आहे़
५० सदस्यांचा कोरम पूर्ण करून १७ डिसेंबर रोजी दौरा निश्चित करण्यात आला होता़ यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसादच मिळाला असून सोमवारी केवळ दोनच निविदा आल्या़ निविदा उघडण्यासाठी किमान तीन निविदा असणे आवश्यक असल्यामुळे ती उघडण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़

Web Title: Mandal did not open the tender for Kerala