मुख्याध्यापकाविना नाचनवेल शाळेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:49+5:302021-01-13T04:10:49+5:30

विज्ञान पेटीतील साहित्य व संगणक संच वापराविना पडून आहेत. वर्गखोलीच्या किरकोळ दुरुस्तीअभावी राज्य शासनाने पुरवलेल्या दीड ते दोन लाख ...

Management of Nachanvel School without a headmaster | मुख्याध्यापकाविना नाचनवेल शाळेचा कारभार

मुख्याध्यापकाविना नाचनवेल शाळेचा कारभार

विज्ञान पेटीतील साहित्य व संगणक संच वापराविना पडून आहेत. वर्गखोलीच्या किरकोळ दुरुस्तीअभावी राज्य शासनाने पुरवलेल्या दीड ते दोन लाख किमतीचे विज्ञानपेटीतील साहित्य वापराविना पडून आहे. तसेच सॉफ्टवेअर अपडेट करणे, किरकोळ तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे दहापेक्षा जास्त संगणक संच धूळखात पडले आहेत. विद्यमान प्रभारी मुख्याध्यापकांना आर्थिक अधिकार नसल्याने निधीची तरतूर करता आलेली नाही.

शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका उदासीन

शालेय कामकाजात गती, समन्वय, पारदर्शकता आणि लोकसहभाग मिळवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असतानादेखील शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका उदासीन झाली आहे. एक महिन्यापूर्वी नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला अत्यंत संवेदनशील बैठकीकडेही बहुतांश पदाधिकारी व सदस्यांनी पाठ फिरविली होती.

तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपणे

काही दिवसांपूर्वी शालेय साहित्य, खिडक्या व सूचनफलकाच्या तोडफोडीचा प्रकार घडला होता. आपल्या गावाला घडविणारी ही आदर्श शाळा असून तिचा परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने विशेषतः तरुणांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रशालेची पटसंख्या आजघडीला तीनशेच्या आत आली असून शिक्षण विभागाने तात्काळ मुख्याध्यापकाची नेमणूक करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.

नाचनवेल बातमीसोबत एक फोटो आहे.

Web Title: Management of Nachanvel School without a headmaster