शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१२ पथकांची निगराणी

By admin | Updated: May 8, 2016 23:51 IST

राजेश खराडे , बीड खरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे.

राजेश खराडे , बीडखरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे. त्या प्रमाणात मागणीही करून खत, बियाणांचा पुरवठा होण्यास सुरवात झाली आहे. खरेदी-विक्रीत अनियमितता होऊ नये म्हणून जिल्ह्यात १२ पथके नेमण्यात आली आहेत. खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र लक्षात घेता १ लाख ४६ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे, पैकी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. बियाणांच्या ७० हजार क्विंटलच्या मागणीनुसार कृषी विभागाकडे सोयाबीनचे १५ हजार क्विंटल खत उपलब्ध झाले आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांकडून मानवनिर्मित टंचाई दर्शविण्यात आली होती.यंदा अगोदरच शेतकरी दुष्काळात होरपळलेला आहे अशातच खते, बियाणांच्या पुरवठ्यात अनियमितता होऊ नये म्हणून जिल्हा पथकासह तालुकानिहाय एक पथक नेमण्यात आले आहे. पथकाकडून बियाणांची खरेदी, पावती, विक्रीच्या रजिस्टरला नोंदी, दुकानासमोर दरफलक, तसेच उपलब्ध खत, बियाणांचा साठा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे २०० पेक्षा अधिक खत, बियाणे विक्रेते आहेत. गतवर्षी विक्रीमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने अंबाजोगाई येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर तिघा जणांचा परवाना जप्त करून आठ जणांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पथकाने केली होती. पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण बियाणांची विक्री झाली नव्हती, त्यामुळे गतवर्षीचे बियाणे व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. त्याचीच विक्री यंदाही होऊ नये याचे मोठे आव्हान पथकासमोर राहणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्या तालुक्याची जबाबदारी असून, यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय पथक नेमण्यात आले आहे. सद्य:स्थितीला खत, बियाणे विक्रीला सुरुवात झाली नसली तरी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, सोयाबीनचे १५ हजार, उडदाचे एक हजार क्विंटल, तर कापसाच्या २ लाख ५० पाकिटांचा साठा कृषी विभागाकडे आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन्हीही मुख्य हंगामातील पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान होत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी खरिपाबाबत जिल्हा कृषी विभाग तत्पर झाला आहे. बळीराजाही मशागतीच्या कामाला लागला आहे.प्रशासन दरबारी २०० खत, बियाणे विक्रेत्यांची नोंद असली तरी आता ग्रामीण भागातही अनाधिकृतपणे विके्रत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याचे मोठे आव्हान आहे. ४तालुक्याचे पथकप्रमुख तालुका कृषी अधिकारी राहणार असून, ३५ अधिकाऱ्यांद्वारे खत, बी-बियाणांच्या विक्रीमध्ये होणारी अनियमितता आटोक्यात आणली जाणार आहे.\तक्रार समोर येताच दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी सर्व बाबींचे रेकॉर्ड बाळगणे अनिवार्य राहणार आहे. ज्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत, त्यांच्याकडून खत, बियाणांचा विक्री होणे गरजेचे आहे.- डी. बी. बिटके, पथक प्रमुख सर्वाधिक बियाणे सोयाबीनचेजिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत असले तरी यामधून शेतकऱ्याचे अधिकचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे यंदा कापसावर भर न देता सोयाबीनच्या लागवडीविषयी कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचाही ओढा सोयाबीन व कडधान्यावरच आहे. त्यामुळे ७० हजार क्विंटलच्या बियाणे मागणीमध्ये सोयाबीन ५० हजार क्विंटल आहे. त्यापैकी १५ हजार क्विंटलचा पुरवठा झाला असून, शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध आहे.