शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

माळ्याची उमरी येथे धाड

By admin | Updated: May 29, 2014 00:20 IST

दैठणा : माळ्याची उमरी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून नगदी चौदा हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करुन सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़

दैठणा : माळ्याची उमरी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून नगदी चौदा हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करुन सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़ ही कारवाई २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ माळ्याची उमरी येथे राजरोसपणे जुगार खेळला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांना मिळाली होती़ या माहितीवरून पोलिस निरीक्षक राजेंद्र शहाणे, फौजदार राजेश्वर जुकटे, हनुमान मरगळ, विजय कनाके, आरेफ कुरेशी, प्रकाश गायकवाड, ठोंबरे यांनी सापळा रचून तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना धाड टाकली़ यावेळी दत्तराव बाबाराव गोरे, उत्तम गोरे, दत्ता भुजंग लबडे, नारायण रामभाऊ गोरे, ज्ञानोबा श्रीपत माने, उत्तम बाबूराव माळे, नारायण सुदाम गोरे (सर्व रा़ उमरी) यांना रंगेहाथ पकडले़ त्यांची झडती घेतली असता रोख १४ हजार ३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले़ वरील सात जणांविरूद्ध दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यामुळे जुगार खेळणारांचे धाबे दणाणले आहेत़ दैठणा पोलिस ठाण्याअंतर्गत राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत़ पोलिस प्रशासन कागदोपत्री कारवाई दाखविण्यासाठी मोहीम राबविते की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे़ पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याचे मनावर घेतल्यास जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू राहणार नाहीत़ मात्र पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध धंदे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत़ पोलिसांची ही कारवाई अशीच चालू रहावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)पोखर्णी व उमरी या दोन ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करीत असताना दैठणा पोलिसांनी धाड टाकून १ हजार १५० रुपयांची दारू जप्त केली़ ही कारवाई २७ मे रोजी दैठणा पोलिसांनी केली़ दैठणा पोलिस ठाण्याचे पोकॉ संजय अळनुरे यांनी पोखर्णी फाट्यावर रामेश्वर बालाजी भरड (वय २०, रा़ कोडंबवाडी) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून बेकायदेशीररित्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या़ ज्याची किंमत ४५० रुपये एवढी असल्याचे समजते़ दुसर्‍या घटनेत उमरी येथे धाड टाकली असता संतोष लिंबाजी कांबळे यांच्याकडून ७२० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली़ या प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास दैठणा पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत़ पोलिसांच्या आशीर्वादामुळेच ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत़