शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून भाकरवाडीत गाळ उपसा

By admin | Updated: May 31, 2014 01:05 IST

काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे.

काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांनी तलावातील गाळ काढण्याचा संकल्प केला. लगेच २० मे रोजी मुहूर्तसुद्धा साधला. तहसीलदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी मंडळ अधिकारी बी.डी. भांबले, तलाठी अभिजीत पाटील हे उपस्थित होते. इसा पटेल, लक्ष्मण मसलकर, दादाराव तिडके, बाबासाहेब तिडके, सत्तार पटेल, सावळा हरि तिडके, समद पटेल, ज्ञानेश्वर तिडके यांच्यासह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. या तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी जेसीबी मशिन व ट्रॅक्टर्स वापरात आणले आहेत. त्याव्दारे परिसरातील शेतकरी गाळ काढून नेऊ लागले आहेत. या गाळामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. तलावातील गाळ शेतकर्‍यांनी न्यावा, असे आवाहन तहसीलदार क्षीरसागर यांनी केले. सोमठाण्यातही उपसा बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील धरणातील गाळउपसा सुरूवात करण्यात आली आहे. १२ गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आहेत. मागील काही वर्षापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत होते. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याचा परिणाम पाणी साठवणीवर होत आहे. त्यामुळे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून गाळ उपशास सुरूवात करण्यात आली. २६ मे रोजी क्षीरसागर यांनी गाळ उपसाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच दत्ता नागवे, पोलिस पाटील रमेश नागवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दोन दिवसात या धरणातील ३०० ब्रास गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ढोकसाळ, भाकरवाडी, भराडखेडा येथील ग्रामस्थांनी गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सोमठाणा येथील हा दुधना मध्यम प्रकल्प १९६५ साली उभारण्यात आला. पावसाळ्यात यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होते. या जलसाठ्याचा परिसरातील ३४ गावांतील शेतकर्‍यांना शेती पिकांसाठी फायदा होतो आहे. १२ गावांना धरण परिसरातील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणुकीवर त्याचा परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून गाळ काढण्याचे काम प्रशासनाने लोकसहभागातून हाती घेतले आहे.