शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘निम्न तेरणात’ तरंगते विद्युत पंप बसणार

By admin | Updated: April 16, 2016 00:14 IST

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा राहिला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

प्रशासकीय मान्यता : उमरगा पालिकेचा निर्णय उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा राहिला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याच प्रकल्पातील मृतसाठ्यात तरंगते विद्युत पंप पाणी योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय उमरगा पालिकेने घेतला आहे़ २१ लाखांच्या या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़उमरगा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी तेवीस कोटी खर्च करून माकणी प्रकल्पातील पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे़ गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने माकणी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्यावर शहरासह प्रकल्प परिसरातील अनेक गावांची तहान भागत आहे़ सध्या या प्रकल्पात केवळ ३़५ दलघमी पाणीसाठा असून, हा पाणीसाठाही मृतावस्थेत आहे़ या उपलब्ध पाण्यावर निलंगा शहर पाणीपुरवठा, भूकंपग्रस्त ५२ गावे योजना, औसा तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा केला जात आहे़ लातूर शहरासाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ ही परिस्थिती पाहता पालिकेला प्रशासनाच्या सूचनेनुसार पाणीकपात करावी लगली होती़ शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता शहरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ शहरातील साईनगर, गणेश नगर, विष्णूपुरी, औटी नगर, डिग्गी रोड आदी भागात शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे़ शहराला दररोज साधारणत: ३० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे़ माकणी प्रकल्पातून सध्या २० लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे़ हे पाणी आठ दिवसाआड शहराला पुरवठा केले जाते़ उपलब्ध पाणी अपुरे पडत असल्याने विकतच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे़ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माकणी प्रकल्प हा एकमेव पर्याय आहे़ त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने मागील आठ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत संभाव्य पाणीपुरवठा योजनेसाठी तरंगत्या विद्युत पंप योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता़ या प्रस्तावास विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले़अशी आहे योजना : २१ लाख ५७ हजारांचा खर्च अपेक्षितमाकणी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला असून, सध्या केवळ मृतसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पात मागील दोन वर्षापूर्वी पालिकेने विहीर उभारली आहे़ या विहिरीपासून प्रकल्पापर्यंत ८०० मीटरची एनडीपी पाईपलाईन करण्यात येणार आहे़ जोत्याखालील डबक्यात साचलेल्या पाण्यावर दोन तरंगते विद्युत पंप बसवून पाईपलाईनद्वारे हे पाणी विहिरीत घेतले जाणार आहे़ २१ लाख ५७ हजार ४९७ रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे़