शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीचा डोंगर गेला चक्क गगनावरी

By admin | Updated: July 22, 2016 00:45 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील सुमारे सव्वा लाखांहून अधिक मालमत्ताकरधारकांकडे ७५ कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील सुमारे सव्वा लाखांहून अधिक मालमत्ताकरधारकांकडे ७५ कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर आभाळी गेला असून, थकबाकीच्या वसुलीसाठी हतबल झालेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने आजवर केलेले सर्व उपाय अपयशी ठरले आहेत. १ लाख ३७ हजार मालमत्ताधारकांकडे ही थकबाकी आहे. पोलिसांसमोर उभे करण्याची धमकी देणे, घरातील स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देणे, यासारखे उपाय फोल ठरल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने संयुक्तपणे प्रभागनिहाय कर अदालत घेण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या अदालतीमध्ये ८९ पैकी फक्त ३८ करदात्यांनी हजेरी लावली. उपस्थितांनी करमूल्यांकनाच्या तक्रारी करून करअदालतीतून काढता पाय घेतला. आ.सुभाष झांबड, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याही तक्रारी आहेत. त्यांच्या तक्रारींवरून मालमत्तांची पाहणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त बकोरिया यांनी सांगितले. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, गटनेते राजू वैद्य, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत अदालत घेण्यात आली. महापौर तुपे म्हणाले, करदात्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. करांप्रकरणी, मूल्यांकनाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी नागरिकांची घरे पाडली गेली आहेत. त्यांना बेहिशोबी कर लागला आहे. २५ ते ५० टक्के कर भरण्यास नागरिक तयार झाले आहेत. ४ कोटी ५३ लाख रुपयांच्या कर थकबाकीसाठी ८९ नागरिकांना आज बोलावण्यात आले होते. किती दिवस ही करअदालत चालणार, १ लाख ३१ हजार करदात्यांकडे बाकी आहे. यावर आयुक्त म्हणाले, सध्या झोननिहाय नियोजन केले आहे. नवीन मालमत्तांना मूल्यांकन करण्याचा प्रयत्न राहील.