भगवान बुद्धांचा शांतीचा विचार जगाला आवश्यक - दत्ता भगत

By Admin | Updated: May 16, 2014 00:16 IST2014-05-15T23:28:48+5:302014-05-16T00:16:19+5:30

नांदेड : केळूस्कर गुरूजींनी बालवयातच डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांवर तथागताचे संस्कार घडविले़

Lord Buddha's peace needs the world - Datta Bhagat | भगवान बुद्धांचा शांतीचा विचार जगाला आवश्यक - दत्ता भगत

भगवान बुद्धांचा शांतीचा विचार जगाला आवश्यक - दत्ता भगत

 नांदेड : केळूस्कर गुरूजींनी बालवयातच डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांवर तथागताचे संस्कार घडविले़ त्यातूनच बाबासाहेब बुद्ध विचारांकडे वळले़ आज बुद्ध विचारांची गरज संपूर्ण जगाला असल्याचे प्रतिपादन विचारवंत प्रा़ दत्ता भगत यांनी केले़ बुद्ध जयंतीचे औचित्य साधून प्रा़ भगत लिखित गौतम बुद्धांचे संक्षिप्त चरित्र, गोष्ट गोधराजाची आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा या तीन पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले़ जि़ प़ च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भीमराव शेळके होते़ तर प्रा़ डॉ़ राजेंद्र गोणारकर, जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, प्रज्ञा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा़ सी़ टी़ कांबळे, गणेशराज सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रा़ भगत यांनी पुस्तक लेखनामागची आपली भूमिका विशद केली़ बुद्ध चरित्राचे पहिले लेखक केळुस्कर गुरूजींच्या जीवनावर एका नव्या दृष्टीकोनातून त्यांनी प्रकाश टाकला़ प्रमुख वक्ते प्रा़ डॉ़ गोणारकर यांनी बालसाहित्यात प्रा़ भगत यांची ही पुस्तके मोलाची भर टाकणारे असल्याचे सांगितले़ आपले बालसाहित्य हे दैववादाचे संस्कार करते़ त्यामुळे ते पराभूत करणारे व अगतिक बनविणारे आहे़ मात्र प्रा़ भगत यांनी लिहिलेले भगवान बुध्दांचे चरित्र बालकांना वास्तविकता शिकविते असेही ते म्हणाले़ मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी बालमनावर संस्कार करण्यासाठी बालसाहित्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले़ प्रा़ भगत यांच्या पुस्तकांमुळे ती भरून निघाल्याचे ते म्हणाले़ प्रास्ताविकात प्रज्ञा ग्रंथालयाचे चिटणीस भानुदास पोवळे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली़ सूत्रसंचालन प्रा़ शा़द़ जोंधळे यांनी केले़ तर आभार आऱ आऱ टोंपे यांनी मानले़ डॉ़ करूणा जमदाडे, प्रा़ लक्ष्मण कोत्तापल्ले, प्रा़ डॉ़ अजय गव्हाणे, निर्मलकुमार सूर्यवंशी, डॉ़ अंजनीकर, प्रा़ आऱ एऩ कांबळे, डॉ़ सुरेश गजभारे, उदय गजभारे, जयप्रकाश सुरनर, सुनीता कांबळे, प्राचार्य नवसागरे, बाबाराव नरवाडे, सौ़ भगत, आश्लेषा राजेंद्र, एकनाथ सोनवणे, प्रा़ गावंडे, रंगारी आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Lord Buddha's peace needs the world - Datta Bhagat