शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकांचे साडेतीन लाख रुपये लुटले

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

वाळूज महानगर : कारचे आॅईल गळत असल्याची थाप मारून फर्निचर व्यावसायिकांचे साडेतीन लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी लांबविल्याची घटना

वाळूज महानगर : कारचे आॅईल गळत असल्याची थाप मारून फर्निचर व्यावसायिकांचे साडेतीन लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी पंढरपुरातील अब्बास पेट्रोल पंपावर घडली.याविषयी अधिक माहिती अशी की, उदयसिंग गणपत गायकवाड (३५, रा. स्नेहवर्धिनी सोसायटी, जवाहर कॉलनी) यांचे जवाहर कॉलनीत फर्निचर विक्रीचे दुकान आहे. उदयसिंह गायकवाड हे आज दि.३ नोव्हेंबरला पंढरपूरच्या अलाहाबाद बँकेत कर्जाचा हप्ता भरण्यासाठी डस्टर कार क्रमांक एमएच-२०, डीजे-७१७१ मध्ये बसून पंढरपूरकडे निघाले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास उदयसिंग गायकवाड हे गाडीत इंधन भरण्यासाठी नगर रोडवरील अब्बास पेट्रोल पंपावर आले होते. कारमध्ये इंधन भरत असताना एका अनोळखी युवकाने गायकवाड यांना तुमच्या कारमधील आॅईल गळत असल्याचे सांगितले. त्यामुळे इंधन भरल्यावर गायकवाड हे पेट्रोल पंपालगत थांबून कारचे बोनट उघडून इंधन कुठून गळत आहे, याची पाहणी करीत होते. याचदरम्यान, डोक्यात पिवळी टोपी घातलेल्या युवकाने शिताफीने कारचा दरवाजा उघडला व तिच्यात ठेवलेली साडेतीन लाख रुपये रकमेची बॅग घेऊन तो मुख्य रस्त्याच्या दिशेने पळाला. हा लुटमारीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच उदयसिंग गायकवाड यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी दुचाकीवरून डबलसीट आलेले युवक बॅग चोरलेल्या युवकाला दुचाकीवर बसवून औरंगाबाद शहराकडे सुसाट वेगाने पसार झाले. हा आरडाओरडा ऐकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी व इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत साडेतीन लाख रुपये लुटून चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या गायकवाड यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांशी संपर्क साधून साडेतीन लाख रुपये लुटल्याचे पोलिसांना सांगितले.अब्बास पेट्रोल पंपावर दुपारी २ वाजता उदयसिंग गायकवाड हे कारमध्ये इंधन भरत असताना एका युवकाने त्यांच्या कारवर आॅईल फेकले होते. या युवकाचा साथीदार लाल रंगाच्या टीव्हीएस स्टार या दुचाकीवर स्वार झालेला होता. कारवर आॅईल फेकणाऱ्या युवकानेच तुमच्या कारमधून आॅईल गळत असल्याची थाप गायकवाड यांना मारली होती. कार उभी करून आॅईल गळत असल्याने बोनट उघडून पाहणी करीत असताना एक भामटा कारमधील रकमेची बॅग काढून मुख्य रस्त्याच्या दिशेने पळाला, तर दुचाकीवर असलेले त्याचे दोन साथीदार त्याला दुचाकीवर बसवून घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने तीन भामट्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच फौजदार अजय पांडे, गुन्हे शाखेचे फौजदार यू.पी. ठाकूर, पोकॉ. काकासाहेब तुपे, अमोल शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. कारचालकाला लुटणारे गुजरात राज्याच्या टोळीतील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरू होती.