थाप मारून वृद्धाचे १५ तोळे सोने लुटले

By Admin | Updated: February 9, 2016 00:32 IST2016-02-09T00:20:16+5:302016-02-09T00:32:51+5:30

औरंगाबाद : आम्ही पंचायत समितीतून आलो आहोत. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मंजूर करण्याचे काम आमच्याकडे आहे, अशी थाप मारून घरात

Looted 15 tol pieces of old man | थाप मारून वृद्धाचे १५ तोळे सोने लुटले

थाप मारून वृद्धाचे १५ तोळे सोने लुटले


औरंगाबाद : आम्ही पंचायत समितीतून आलो आहोत. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मंजूर करण्याचे काम आमच्याकडे आहे, अशी थाप मारून घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी एका ८० वर्षीय वृद्धाला भरदिवसा लुटले. आधार कार्ड दाखवा, असे म्हणून स्वत: कपाट उचकटून १५ तोळे सोने आणि रोख १६ हजार रुपये लांबविले.
ही घटना सोमवारी दुपारी घडली. घडली. पोलिसांना मात्र ३ वाजता याबाबत माहिती मिळाली. यापूर्वीही घरात घुसून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवीदास देशपांडे (रा. रोकडिया हनुमान कॉलनी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मुलगा प्रसाद यांची श्रीपाद इंजिनिअरिंग नावाने कंपनी आहे. सोमवारी मुलगा कंपनीत आणि सून माहेरी गेली होती. देशपांडे हे २४ वर्षांपूर्वी कृषी खात्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत. (पान २ वर)

Web Title: Looted 15 tol pieces of old man