औरंगाबाद : महापालिकेने काल ११ आॅगस्टच्या सभेत ऐनवेळी काही मर्जीतील प्रस्ताव घुसडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐनवेळच्या प्रस्तावात काय होते याबाबत नगर सचिव विभागाकडून काहीही अधिकृत सांगण्यात आलेले नाही, तर सत्ताधारी देखील त्याबाबत काहीही बोलत नसल्यामुळे यामागे मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. सभेत सर्व मिळून ६२ ठराव होते. त्यापैकी विषयपत्रिकेवर ६१८ पर्यंतचे विषय होते. त्यापुढील ऐनवेळी आलेल्या सर्व विषयांना मंजुरी देण्याचे आदेश महापौर कला ओझा यांनी दिले होते. बजेटमध्ये आता स्पील ओव्हरची कामे होणार नाहीत. जी कामे होतील ती तरी आपल्या मर्जीनुसार व्हावीत यासाठी नगरसेवकांनी बजेटमधील हेड चेंज करण्याचे ४८ प्रस्ताव सभेत मंजूर करून घेतले. जवळपास सर्वपक्षीय नगरसेवकांनी ते प्रस्ताव मांडले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० आॅगस्टनंतर केव्हाही लागेल. पुढील सभा आचारसंहितेनंतर होणार असल्याने नगरसेवकांनी आताच शीर्षक बदलण्याची कामे करून घेतली. यामध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी प्रस्ताव ठेवले होते.त्या ऐनवेळच्या प्रस्तावांत नगरसेवकांनी शीर्षके बदलण्याचे प्रस्ताव टाकले होते, की सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे मर्जीतील प्रस्ताव घुसडले यावरून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. नगर सचिव प्रमोद खोब्रागडे हे सभागृह नेत्यांच्या दालनात आले होते. त्यांनाही ऐनवेळच्या प्रस्तावांबाबत विचारले असता, त्यांनीही काही उत्तर दिले नाही.
ऐनवेळच्या प्रस्तावांचे गौडबंगाल कायम
By admin | Updated: August 13, 2014 01:44 IST
औरंगाबाद : महापालिकेने काल ११ आॅगस्टच्या सभेत ऐनवेळी काही मर्जीतील प्रस्ताव घुसडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऐनवेळच्या प्रस्तावांचे गौडबंगाल कायम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}