घरफोडीत तीन लाखांसह १२ तोळे सोने लंपास

By Admin | Updated: March 2, 2015 00:53 IST2015-03-02T00:33:42+5:302015-03-02T00:53:41+5:30

परळी : तालुक्यातील मांडखेल येथील एका घरामध्ये चोरट्याने घुसून तीन लाख रूपयांची नगदी रोकड व ११ तोळे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख १२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

Lonaprasala with 12 lakhs of gold in three houses | घरफोडीत तीन लाखांसह १२ तोळे सोने लंपास

घरफोडीत तीन लाखांसह १२ तोळे सोने लंपास


परळी : तालुक्यातील मांडखेल येथील एका घरामध्ये चोरट्याने घुसून तीन लाख रूपयांची नगदी रोकड व ११ तोळे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख १२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
परळी तालुक्यातील मांडखेल येथे बाळासाहेब माणिक घुगे हे वास्तव्यास आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील नाथापिंप्री येथे जमीन खरेदी केली होती. खरेदीनंतर त्यांच्याकडे तीन लाख रूपये शिल्लक होते. लोकांकडून घेतलेले हातउसणे पैसे परत देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र शनिवारी रात्री त्यांच्या घरामध्ये चोरट्याने प्रवेश केला. त्यानंतर घरातील एका खोलीमध्ये असलेल्या दोन लोखंडी पेटीतील तीन लाख रूपयांची रोकड, ११ तोे ६०० ग्रॅम सोने असा एकूण पाच लाख १२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पळवून नेला.
घरात घुसताना खिडक्याच्या सळया तोडण्यात आल्या होत्या. चोरी करून जाताना चोरांनी याच सळ्या गावाबाहेर असलेल्या एका स्मशानभूमीमध्ये फेकून दिल्या होत्या. सकाळी चोरी झाली असल्याची बाब घुगे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे, एडीएस सहायक पोलीस निरीक्षक भारत राऊत व परळी ग्रामीणचे पोलीस अधिकारी, कर्मचारी येथे दाखल झाले. बाळासाहेब घुगे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Lonaprasala with 12 lakhs of gold in three houses