शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown In Aurangabad : शंका नको;  लॉकडाऊन वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:08 IST

नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत होणार आहे.  

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणारवाळूज महानगरात दोन दिवस रॅपीड टेस्टिंग मोहीम

औरंगाबाद : रुग्णसंख्या वाढत असल्याने १० ते १८ जुलैपर्यंत शहर आणि वाळूज महानगरात असलेल्या लॉकडाऊनला १८ जुलैनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले. 

सध्या असलेल्या लॉकडाऊनच्या काळातच (१८ जुलैच्या आत शक्यतो शुक्रवार आणि शनिवार)  वाळूज व परिसरात रॅपीड टेस्टिंंग मोहीम राबविण्यात येईल, जेणेकरून कोरोना संशयित रुग्ण शोधले जातील, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.नागरिकांच्या सहभागामुळे लॉकडाऊन यशस्वी झाले आहे. वाढत जाणारी रुग्णसंख्या थांबविण्यासाठी आमचा सहभाग घ्या, असे नागरिकांचे मत होते. त्यातूनच १० जुलैपासून शहरात संचारबंदी लागू केली आहे. आजपर्यंत लॉकडाऊन काळात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व आस्थापना, उद्योग बंद आहेत. किराणा दुकाने बंद आहेत. शहर आणि वाळूजसह सर्व औद्योगिक वसाहती बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची स्टिकर्स लावून फिरणाऱ्या वाहनांची वर्दळदेखील कमी आहे. पेट्रोलपंपांवर महत्त्वाच्या वाहनांविना कुणालाही इंधन दिले जात नाही. भाजीपाला, फळ मार्केट पूर्णपणे बंद आहेत. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत होणार आहे.  

इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झाले कमीशहरात सध्या रॅपीड अँटिजन टेस्ट सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चाचणी करण्यात येत असून, अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल प्राप्त होत असल्यामुळे बहुतांश प्रमाणात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले. 

दुकाने रोज उघडण्याचा विचार संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी पडू शकते. त्यासाठी सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू ठेवण्याऐवजी सर्व दुकाने उघडण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होईल. संचारबंदीनंतर नागरिकांनी मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे किंवा स्वच्छ धुऊनच इतरत्र स्पर्श करावा, सोशल डिस्टन्सिंंग पाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाळूज परिसरात १४ दिवसांची संचारबंदी वाळूज औद्योगिक वसाहतीत ४ ते १२ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर १०  ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केलेल्या संचारबंदीत वाळूज परिसराचा समावेश केला. १० ते १८ जुलैदरम्यानच्या संचारबंदीत उद्योजकांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. वाळूज परिसरात ४ ते १८ जुलैपर्यंत म्हणजे १४ दिवस संचारबंदीचे राहणार आहेत. यात ९ दिवस बहुतांश उद्योगांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी वाळूजसह सात ग्रामपंचायत परिसराला मिळाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद