शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेतू सुविधा केंद्राला ठोकले कुलूप

By admin | Updated: June 24, 2014 00:43 IST

सेलू : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व शेतकऱ्यांची पिळवणुक होत असून केंद्राकडून कुठलेच काम मुदतीत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे़

सेलू : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व शेतकऱ्यांची पिळवणुक होत असून केंद्राकडून कुठलेच काम मुदतीत होत नसल्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २३ जून रोजी सेतू सुविधा केंद्राला कुलूप ठोकून तहसीलदार आसाराम छडीदार यांना घेराव घातला.
शासनाने सामान्य जनतेसाठी शासकीय कागदपत्रे सोयीस्कर पद्धतीने मिळावेत या हेतूने सेतू सुविधा केंद्राची स्थापना केली़ परंतू येथील सेतू सुविधा केंद्राचे संचालक मनमानी कारभार करीत असून शेतकरी व विद्यार्थ्यांची आर्थिक लुट करत आहेत़ यामुळे सर्वच जण त्रस्त झाले आहेत़ या प्रकाराकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे़ केंद्रातून अनेक विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या संचिका गलथान कारभारामुळे गहाळ झाल्या आहेत़ त्याचा नाहक त्रास शेतकरी व विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो़ तसेच सेतू केंद्रात अनेक प्रमाणपत्राचे नमुने उपलब्ध नाहीत़
दलालकडून आलेल्या कामांना सेतूच्या संचालकाकडून प्राधान्य दिले जात आहेत व सर्वसामान्यांची पिळवणूक करीत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्राला कुलूप ठोकत तहसीलदारांना घेराव घातला़ या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छगन शेरे, रणजित चव्हाण, रामेश्वर शेरे, महेश मुसळे, विक्रांत पाटील, ऋषी चट्टे, अ‍ॅड़ उमेश काष्टे, अमोल शेवाळे, भागवत मगर, शशांक टाके, संदीप डाके, श्रीराम डासाळकर, शिवाजी पांचाळ आदीजण सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक
२४ तासात प्रलंबित प्रमाणपत्रे देण्याचे आश्वासन तहसीलदारांनी देत संबंधितांवर कार्यवाही करणार असल्याचे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले़ कार्यालयाला कुलूप ठोकल्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़