शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या ४ गांजा तस्करासह स्थानिक आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST

औरंगाबाद: मुंबईहून शहरात गांजासह आलेले ४ तस्कर व स्थानिक खरेदीदाराला सापळा रचून पोलीस आयुक्तांच्या पथकाने रविवारी दुपारी अटक ...

औरंगाबाद: मुंबईहून शहरात गांजासह आलेले ४ तस्कर व स्थानिक खरेदीदाराला सापळा रचून पोलीस आयुक्तांच्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून १५ किलो गांजा आणि कार, दुचाकी जप्त करण्यात आली.

अब्दुल गफार खान अब्दुल करीम (३७, रा . कैसर कॉलनी), कारचालक इमरान मोहम्मद हनीफ बलोच (३७, रा. जनता कॉलनी, अंधेरी पश्चिम , मुंबई), शफिक नबी पटेल (२६, जनता कॉलनी,अंधेरी ), अब्दुल गणी जहाॅँगीर शेख (२३,रा.मुंबई ) आणि एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार चंपा चौक ते चेलीपुरा रस्त्यावर गांजाची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली. यानंतर त्यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार एस.जे. सय्यद., ए.आर.खरात, व्ही. आर. निकम, व्ही.जे. आढे, महिला हवालदार श्रुती नांदेडकर यांनी रविवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास चंपाचौक ते चेलीपुरा रस्त्यावर सापळा रचला. तेव्हा संशयित कार तेथे येऊन थांबली याचवेळी दुचाकीस्वार आला. कारमधील आरोपींनी दुचाकीस्वाराला चार पाकीट दिले. हे पाकीट घेऊन तो शहाबाजारकडे निघताच त्याला आणि कारमधील आरोपींना पोलिसांनी पकडले. पंचासमक्ष आरोपीच्या वाहनाची झडती घेतली असता. दुचाकीस्वाराजवळील चार पाकिटात गांजा आढळला. या गांजाचे वजन केले असता ते १५ किलो १६९ ग्रॅम भरले. कारमधील गांजा तस्कर आरोपीसह दुचाकीचालक स्थानिक गांजाचा खरेदीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.