शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

बजेटवर थोडी खुशी थोडा गम..!

By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ९६ प्रमाणे सन २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१४-१५ चे प्रस्तावित अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ९६ प्रमाणे सन २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१४-१५ चे प्रस्तावित अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले. सकाळी १० वाजता स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री बजेट सादर करण्यासाठी सभागृहात दाखल झाले. मात्र मनपा आयुक्त व महापौर उपस्थित नसल्याने विरोधकांनी आयुक्त आल्याशिवाय बजेट सादर करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने जवळपास एक तास उशिराने स्थायी समितीचे मिस्त्री यांनी प्रभारी महापौर सुरेश पवार यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०१४-१५ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात घेण्यात आलेल्या विविध योजना व विकास कामांवर सत्ताधारी सदस्यांनी समाधान व्यक्त केले, तर विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. सदरील अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला आहे. याविषयी १५ दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत सभागृहात आलेल्या सुचनेनुसार त्याला मूर्तरुप मिळणार आहे. तत्पूर्वी यावर आनंद व्यक्त करणे योग्य नसल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक योजना, दलित वस्ती योजना, दलितेत्तर योजना, नाट्यगृह बांधणे, शादीखाना बांधणे, कत्तलखाना उभारणे यासह शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण हाती घेण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात सादर करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन स्थायी समितीचे सभापती राम कोंबडे हे सदरील अर्थसंकल्प सादर करणार होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते सादर करता आले नाही. त्यामुळे नूतन सभापती अख्तर मिस्त्री यांनी राम कोंबडे यांच्या कालावधीतील अर्थसंकल्प शुक्रवारी सभागृहात मांडला. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, प्रभारी महापौर सुरेश पवार आदींची उपस्थिती होती.जुने बजेट रेंगाळले...लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी २०१४ रोजी तयार झालेले बजेट सादर करता आले नाही. त्यामुळे तब्बल पाच महिने उशिराने मनपाचे बजेट शुक्रवारी स्थायी समितीच्या सभापतींनी सादर केले.