नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर

By Admin | Updated: August 19, 2014 02:17 IST2014-08-19T01:58:25+5:302014-08-19T02:17:17+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यात आलेल्या नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी यापुढे राज्य स्तरावर तयार केली जाईल आणि त्यानुसारच पदोन्नत्या दिल्या जातील,

List of Senior Talukdars on the State level | नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर

नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर




औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यात आलेल्या नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी यापुढे राज्य स्तरावर तयार केली जाईल आणि त्यानुसारच पदोन्नत्या दिल्या जातील, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी आज तहसीलदार-नायब तहसीलदार महासंघाच्या मेळाव्यात दिले.
तहसीलदार-नायब तहसीलदार महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा आज देवगिरी महाविद्यालयात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते झाले. यावेळी तलाठी संघाचे राज्याध्यक्ष अशोक कोकाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे, विभागीय अध्यक्ष विष्णू लोखंडे, तलाठी संघाचे सतीश तुपे, उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, महासंघाचे अध्यक्ष बालाजी क्षीरसागर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
राज्यमंत्री धस म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या नायब तहसीलदारांची ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर करून त्यानुसारच कार्यवाही केली जाईल. सर्व संघटनांना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. पदोन्नत नायब तहसीलदारांबाबत मात्र, जुन्याच पद्धतीने विभागीय स्तरावर ज्येष्ठता यादी तयार करून पदोन्नती देण्यात येईल. नायब तहसीलदारांचा ग्रेड पेचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी धस यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची सूचनाही केली. कार्यक्रमाचे संचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. आभार किशोर देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास तहसीलदार रमेश मुनलोड, ज्योत्स्ना धुळे, शिनगारे, राहुल गायकवाड, महादेव किरवले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे देवीदास जरारे, पी. के. सोनवणे, जे. डी. दळवी, सुरेश सोनवणे, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.

Web Title: List of Senior Talukdars on the State level