दारू परवाने वाटले खिरापतीप्रमाणे

By Admin | Updated: January 7, 2015 01:02 IST2015-01-07T00:47:08+5:302015-01-07T01:02:37+5:30

बीड : मागील तीन महिन्यांत ५० बिअर शॉपी, परमिट रूम, देशी विदेशी दारू विक्रीला येथील राज्य उत्पादक शुल्क कार्यालयातून मान्यता देण्यात आली़

The liquor licenses felt like a charmer | दारू परवाने वाटले खिरापतीप्रमाणे

दारू परवाने वाटले खिरापतीप्रमाणे


बीड : मागील तीन महिन्यांत ५० बिअर शॉपी, परमिट रूम, देशी विदेशी दारू विक्रीला येथील राज्य उत्पादक शुल्क कार्यालयातून मान्यता देण्यात आली़
तीन महिन्यांत जिल्ह्यात ५० दुकानदारांना परवाने देताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे की नाही याविषयी शंका निर्माण होत आहे़ एकीकडे उत्पादन शुल्क कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे तर दुसरीकडे परवाना देण्याचा सपाटा दणक्यात सुरू आहे़ येथील उत्पादन शुल्क कार्यालयात इन्स्पेक्टरची सर्वच पदे रिकामी आहेत़ त्यामुळे अवैध दारू विक्रीवर छापे कोण टाकणार असा प्रश्न निर्माण होत आहे़ इतर कामांना कर्मचारी कमी असल्याचा बाऊ येथील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केला जातो़ दुकानांना परवाने देताना मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता भासत नाही याचा ‘अर्थ’ काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे़
दारू विक्री परवाना देताना १६ ते १७ प्रकारची प्रमाणपत्रे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला देणे आवश्यक आहे़ मात्र, या कागदपत्रांची पूर्तता संबंधित यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करून घेतली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
याबाबत संबंधित प्रभारी अधीक्षक के़जी़राऊत यांच्याशी संपर्क झाला नाही़ (वार्ताहर)

Web Title: The liquor licenses felt like a charmer