'लेकी सावित्री व माँ जिजाऊंच्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:40+5:302021-01-13T04:10:40+5:30

औरंगाबाद : विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा मंगळवारी आ. अतुल सावे यांच्या हस्ते 'लेकी सावित्री व माँ जिजाऊंच्या' सन्मान सोहळा ...

'Leki Savitri and Maa Jijaun's' | 'लेकी सावित्री व माँ जिजाऊंच्या'

'लेकी सावित्री व माँ जिजाऊंच्या'

औरंगाबाद : विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा मंगळवारी आ. अतुल सावे यांच्या हस्ते 'लेकी सावित्री व माँ जिजाऊंच्या' सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

मनपाच्या इंदिरानगर, बायजीपुरा येथील शाळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे होते. साहिल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला.

हेमलता भुयार, संध्या पंडित, स्मिता मुळे, आयेशा परवीन, छाया चापोलीकर, अनिता कुलकर्णी, शेख सुलताना निसार अहमद, शेख साकेरा शेख इक्बाल, शुभांगी पांगारकर, मधुरा जोशी, सारिका जैन, स्वाती कुलकर्णी, सुविद्या पंचपोर, पुष्पा गायकवाड, रंजना सोनवणे, अस्मिता अंभोरे, शीला वैद्य व ज्योत्स्ना वाघमारे यांचा यावेळी आ. सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रारंभी मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी प्रास्ताविक केले. विद्युलता गोरे व क्रांती देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. सरिता वामन यांनी आभार मानले.

कविता जाधव, सुशांत मोरे, राखी देसरडा, संजय जाईबहार, ज्ञानदेव सांगळे, संगीता ताजने, मंगला एलकटवाड, रमेश हरणे, अलताजबाजी, कौसर सायरा, इंदुमती शिंदे, सदरखान पठाण आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

कल्पना खामगावकर, अर्चना मोहिते, शीतल आव्हाड, स्मिता नाईक, रेखा महाजन, उज्ज्वला जंजाळ, प्रशांत छडीदार, उमेश गायकवाड, शिवा साळवे, ज्योती शिंदे, जितेंद्र अहिरे, विजेंद्र गवई, साहेबखान पठाण आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: 'Leki Savitri and Maa Jijaun's'