शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय वापरणारे ‘लयभारी’

By admin | Updated: May 3, 2016 01:05 IST

नांदेड : जिल्ह्यात १ जून २०१६ नंतर ज्या कुटंबाकडे शौचालय बांधलेले नसेल अशा कुटुंबांच्या घरावर लाल रंगाचे खतरा धोका असलेले स्टीकर्स लावण्यात येतील,

नांदेड : जिल्ह्यात १ जून २०१६ नंतर ज्या कुटंबाकडे शौचालय बांधलेले नसेल अशा कुटुंबांच्या घरावर लाल रंगाचे खतरा धोका असलेले स्टीकर्स लावण्यात येतील, तर शौचालय वापर करणाऱ्यांच्या घरावर लयभारी नावाचे हिरव्या कलरचे स्टीकर्स लावण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली.हागणदारीमुक्तीसाठी जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी व मिनी बीडीओ हे गावामध्ये मुक्कामी राहून ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक तालुक्यातून ६० टक्के गावांची निवड करुन ही गावे जुलै अखेर तर उर्वरित गावे २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. गावातून शौचालय बांधकाम व शौषखड्यांचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक वार्डनिहाय गावातील महत्वाच्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यांचे मिनी बीडीओ नियोजन करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन कक्षामार्फत शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरावर लाल रंगाचे खतरा स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. ज्या कुटंबांकडे शौचालय आहे व कुटंबातील सर्व सदस्य शौचालयाचा वापर करातात. अशा घरावर लयभारी नावाचे हिरव्या कलरचे स्टीकर्स लावले जातील. तसेच ज्यांच्याकडे शौचालय असून कुटुंबातील काहीच सदस्य त्याचा वापर करीत असतील अशांच्या घरावर पिवळ््या रंगाचे फिप्टी - फिप्टी - फिप्टी लिहलेले स्टीकर्स लावण्यात येणार आहेत.गेल्या १५ दिवसापासून ग्रामसेवकांना पाणीटंचाई, शौचालय बांधकाम तसेच शौषखड्ड्यासाठी दररोज ग्रामपंचायतीमध्ये जावे असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी दिले आहेत. जे ग्रामसेवक गावात येत नाहीत त्यांची नावे ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांच्याकडे कळवावीत.२०१६-१७ या चालू वर्षात शौषखड्यासह शौचालय बांधकामाची मोहीम गतिमान करण्यात येणार आहे. येत्या २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. याकामी ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ, निर्मल, हागणदारीमुक्त, डासमुक्त करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगला गुंडले, मुख्य कार्यकारी अधिकारी काळे, आरोग्य सभापती संजय बेळगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)