तीन लाखांचे कपडे लंपास

By Admin | Updated: December 28, 2014 01:16 IST2014-12-28T00:47:01+5:302014-12-28T01:16:16+5:30

परळी : शहरातील स्टेशन रोडवरील एका कापड दुकानात चोरांनी शुक्रवारी रात्री डल्ला मारला. तीन लाख रुपयांचे कपडे घेऊन चोर पसार झाले.

Lakhs of three lakh clothes | तीन लाखांचे कपडे लंपास

तीन लाखांचे कपडे लंपास


परळी : शहरातील स्टेशन रोडवरील एका कापड दुकानात चोरांनी शुक्रवारी रात्री डल्ला मारला. तीन लाख रुपयांचे कपडे घेऊन चोर पसार झाले.
राजाभाऊ गोविंदराव गुंडाळे यांचे स्टेशन रोडवर कापड दुकान आहे. शुक्रवारी व्यवसाय करुन रात्री ते दुकान बंद करुन गेले. चोरांनी मध्यरात्रीनंतर छतावरील पत्रे उचकावून आत प्रवेश केला. जीन्स पँट, पंजाबी ड्रेस, बनियान आदी कापडे घेऊन चोर पसार झाले. सुमारे तीन लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याची फिर्याद गुंडाळे यांनी परळी शहर ठाण्यात दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला. व्यापाऱ्यांत भीती निर्माण झाली असून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Lakhs of three lakh clothes