आंबे उतरविण्यासाठी मजूर मिळेनात

By Admin | Updated: May 19, 2014 00:16 IST2014-05-18T23:55:06+5:302014-05-19T00:16:28+5:30

परभणी : अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़

Laborers can not get laborers | आंबे उतरविण्यासाठी मजूर मिळेनात

आंबे उतरविण्यासाठी मजूर मिळेनात

 परभणी : अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे़ अशा प्रतिकूल परिस्थिती ग्रामीण भागामध्ये काही आंब्यांना आंबे आहेत़ मात्र हे आंबे उतरविण्यासाठी शेतकर्‍यांना मजूर मिळत नाहीत़ त्यामुळे शेतकर्‍यांची गोची होत आहे़ आंब्याला मोहर लागल्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली़ यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले़ शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे़ त्यातच झाडाला उरला सुरला आंबा उतरविण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत़ त्यातच हे मजूर आव्वाच्या सव्वा भाव सांगत आहेत़ शेतकर्‍यांची गोची होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Laborers can not get laborers