कामगार संघटनेच्या रजा आंदोलनाचा फज्जा

By Admin | Updated: April 26, 2016 23:47 IST2016-04-26T23:32:49+5:302016-04-26T23:47:23+5:30

नांदेड : एसटी कामगार करारातील काही कलमे रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्य परिवहन महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेने २६ आणि २७ एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता़

Labor Organization's leave protest | कामगार संघटनेच्या रजा आंदोलनाचा फज्जा

कामगार संघटनेच्या रजा आंदोलनाचा फज्जा

नांदेड : एसटी कामगार करारातील काही कलमे रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्य परिवहन महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेने २६ आणि २७ एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता़ सामूहिक रजा आंदोलनासाठी महाराष्ट्रातून केवळ २८०० कर्मचाऱ्यांचे रजा अर्ज आले होते़ आंदोलनाकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे मत इंटकचे विभागीय सचिव पी़ आऱ इंगळे यांनी व्यक्त केले़
आंदोलनातील मुद्दे कर्मचारी हिताचे नसून ते मान्यताप्राप्त संघटनेच्या हिताचे असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे इंटकचे म्हणणे आहे़ नांदेड विभागातून ३ हजार २२५ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३१२ कर्मचाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केले होते़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रजा घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा एसटी प्रशासनाने दिल्यानेदेखील अनेकांनी रजा घेतली नाही़ अशा परिस्थितीत आंदोलन फसेल या भीतीने कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय नेहमीप्रमाणे मान्यताप्राप्त संघटनेने आंदोलन मागे घेतल्याचे प्रतिक्रिया इंटकने पी़ आऱ इंगळे यांनी दिली़
दरम्यान, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक झाली़ या बैठकीत प्रशासन आणि परिवहन मंत्र्यांनी रद्द केलेली कलमे ठेवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची प्रतिक्रिया मान्यताप्राप्त संघटनेच्या शीला नाईकवाडे यांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Labor Organization's leave protest