मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराज यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:03 IST2018-05-17T15:02:24+5:302018-05-17T15:03:40+5:30

मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराज यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुपारी निधन झाले. औरंगाबाद जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा भक्त वर्ग असून उद्या सकाळी 10 वाजता श्री.क्षेत्र मुर्डेश्वर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.  

Kishigiri Maharaj of Murdeshwar Sansthan, passed away | मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराज यांचे निधन 

मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराज यांचे निधन 

सिल्लोड ( औरंगाबाद ) : मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराज यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुपारी निधन झाले. औरंगाबाद जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा भक्त वर्ग असून उद्या सकाळी 10 वाजता श्री.क्षेत्र मुर्डेश्वर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.  

बुधवारी (दि. १६ ) रात्री ते मंदिरासमोर असलेल्या खोलीत झोपले होते. आज सकाळी ११ वाजता महाराजांना भेटण्यासाठी काही भक्त गेले असता ते काहीच बोलत नव्हते. यामुळे त्यांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रात्री झोपेतच त्यांना  ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात शोककळा पसरली आहे. कोणालाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. बघता बघता सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आणि संस्थानवर भक्तांनी मोठी गर्दी केली.काशीगिरी महाराज यांचा औरंगाबाद जिल्ह्यात मोठा भक्त आहे. शुक्रवारी सकाळी मुरडेश्वर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Kishigiri Maharaj of Murdeshwar Sansthan, passed away