खुलताबाद पाटबंधारे सिंचन शाखेचा कारभार औरंगाबादेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:20+5:302021-09-22T04:06:20+5:30

सुनील घोडके खुलताबाद : ‘अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आले मना तेथे कुणाचे काही चालेना’ अशीच म्हण सध्या खुलताबाद पाटबंधारे सिंचन शाखा ...

Khultabad Irrigation Irrigation Branch is managed from Aurangabad | खुलताबाद पाटबंधारे सिंचन शाखेचा कारभार औरंगाबादेतून

खुलताबाद पाटबंधारे सिंचन शाखेचा कारभार औरंगाबादेतून

सुनील घोडके

खुलताबाद : ‘अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आले मना तेथे कुणाचे काही चालेना’ अशीच म्हण सध्या खुलताबाद पाटबंधारे सिंचन शाखा क्रंमाक ७ कार्यालयाच्या बाबतीत लागू होत आहे. तालुक्यातील पाच लघु प्रकल्पाचा कारभार या कार्यालयामार्फत बघितला जातो. वास्तविक सदरील कार्यालय खुलताबाद येथे मंजूर असतानाही गेल्या पाच वर्षांपासून या कार्यालयाचा कारभार औरंगाबाद येथून हाकला जात आहे. यामुळे लघु प्रकल्पांच्या देखरेखीवर दुर्लक्ष होत आहे.

खुलताबाद तालुक्यातील निरगुडी, गंधेश्वर, लोणी, टाकळी, सोबलगाव या पाच लघु प्रकल्पांसाठी खुलताबाद येथे कार्यालय मंजूर आहे. मात्र, कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर इमारत घेण्याची तसदी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. गेल्या तीन वर्षांपासून खुलताबाद कार्यालयाचा कारभार हा औरंगाबाद येथील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ जालना रोड येेेेथील एका खोलीतून चालविला जात आहे. एक शाखा अभियंता, एक स्थापत्य अभियंता, दोन दप्तर कारकून, चार कालवा निरीक्षक, दोन मोजणीदार, पाच चौकीदार असे १५ कर्मचारी कार्यरत असून हे सर्व कर्मचारी औरंगाबाद येथेच असल्याने या पाच लघु प्रकल्पाचा कारभार उंटावरून हाकला जात आहे. यामुळे खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना कामकाजासाठी औरंगाबादला चकरा माराव्या लागतात तसेच लघु प्रकल्पांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तरी हे कार्यालय खुलताबादला आणावे, अशी मागणी वाढली आहे.

चौकट...

तीन लघु प्रकल्प ओव्हर फ्लो

यंदाच्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने गंधेश्वर, टाकळी राजेराय, निरगुडी हे तीन लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत तर लोणी व सोबलगाव लघु प्रकल्प येत्या काही दिवसांत ओव्हर फ्लो होण्याचा अंदाज आहे. कर्मचारी, अधिकारी औरंगाबादला राहत असल्याने ते पाहणीसाठीही येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

फोटो: पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक ७ कार्यालय औरंगाबाद येथून जरी सुरू असले तरी कार्यालयीन कामकाजासाठी पत्ता मात्र खुलताबादचाच वापरला जातो.

210921\img-20181023-wa0018.jpg

पाटबंधारे सिंचन शाखा क्रंमाक 7 कार्यालय औरंगाबाद येथून जरी सुरू असले तरी कार्यालयीन कामकाजासाठी पत्ता मात्र खुलताबादचाच वापरला जातो. 

Web Title: Khultabad Irrigation Irrigation Branch is managed from Aurangabad