शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

खामसवाडी सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

By admin | Updated: April 16, 2016 23:54 IST

कळंब/खामसवाडी : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खामसवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचाविरूध्द दाखल अविश्वास ठराव शनिवारी

१२ विरुद्ध शून्य : सत्ताधारी गटाच्या सदस्यांचेही ठरावाच्या बाजूने मतदानकळंब/खामसवाडी : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खामसवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचाविरूध्द दाखल अविश्वास ठराव शनिवारी १२ विरूध्द शून्य मतांनी मंजूर करण्यात आला़ विशेष म्हणजे शिवसेनेच्या सत्ताधारी सदस्यांनीही अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याचे दिसून आले़ मागील काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शितयुध्दाचा परिपाक म्हणून अविश्वास ठरावाकडे पाहिले जात आहे़१५ सदस्य असलेली खामसवाडी ग्रामपंचायत ही कळंब तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, शिवसेनेचे पं.स. सदस्य अमोल पाटील यांच्या गटाचे १२ सदस्य असल्याने ग्रामपंचायतवर त्यांचे वर्चस्व आहे. उर्वरित तीन सदस्य त्र्यबंक शेळके यांच्या गटाचे व राष्ट्रवादीचे आहेत़ सध्या येथे सरपंच म्हणून शिवसेनेच्या शांताबाई शिवाजी शिंदे तर उपसरपंच म्हणून आनंद तापडे काम पाहत आहेत़ शिवसेनेचे अमोल पाटील व राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्या गटात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी राजकीय शितयुध्द सुरू होते़ शिवाय ग्रामपंचायतीतील अंतर्गत गटामध्येही धुसफूस सुरू होती़ परिणामी ११ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सरपंचांविरूध्द तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता़ यात सहभागी होणाऱ्या सदस्यात शिवसेनेच्या गटातून निवडून आलेल्या ९ तर राष्ट्रवादीच्या गटातील तीन सदस्यांचा समावेश होता. या ठरावावर तहसीलदार यांनी चर्चा करण्यासाठी १६ एप्रिल रोजी विशेष बैठक आयोजीत करुन सर्व सदस्यांना नोटीस दिली होती़ खामसवाडी येथील सरपंच पद अनूसूचीत जाती प्रवगार्तील महिलासाठी राखीव आहे. यामुळे ग्रांप अधिनियम १९५८ कलम ३५ (३) नुसार या प्रवर्गातील महिला सरपंचावर अविश्वास ठराव पारीत होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या तीन चतूर्थांश यापेक्षा कमी नसेल इतके बहुमत आवश्यक असते. यामुळे अविश्वास ठराव मंजूर होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंच शांताबाई शिंदे यांच्याविरूद्धच्या अविश्वास ठरावावर हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थीत सर्व १२ सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी नायब तहसीलदार दिलीप शिंदे, मंडळ अधिकारी नितीन मंडाळे, ग्रामविकास अधिकारी जी.एम.भगत, तलाठी एम. के. कांबळे, पोलीस पाटील विक्रम सुतार आदी उपस्थीत होते. (वार्ताहर) तणावपूर्ण वातावरण सरपंच शांता शिंदे यांच्याविरूद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच आनंद तापडे, ज्ञानेश्वर बंडगर, संतोष शेळके, श्रीकृष्ण शेळके, सर्जेराव गर्जे, मिनाक्षी पाटील, सुमन कोकणे, सुनंदा पांचाळ, उज्वला शेळके, भाग्यश्री बिंदले, अनिता कदम, सिमा माळी या बारा सदस्यानी मतदान केले. तर सरपंच शांता शिंदे, सुशिलाबाई अण्णासाहेब शेळके, बाळासाहेब नारायण पाटील हे तीन सदस्य गैरहजर होते. अविश्वास ठरावामुळे गावात तणावपूर्ण वातावरण बनले होते. या पार्श्वभूमीवर सपोनी संभाजी पवार यांनी बंदोबस्त ठेवला होता.