शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंनी निवडले ‘आडगाव भोसले’, धूत यांनी वेरूळ

By admin | Updated: November 2, 2014 00:22 IST

औरंगाबाद : ‘संसद आदर्श ग्राम योजना’मध्ये चंद्रकांत खैरे यांनी आडगाव भोसले आणि राजकुमार धूत यांनी वेरूळला पसंती दिली आहे.

औरंगाबाद : प्रत्येक खासदारांनी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना असलेल्या ‘संसद आदर्श ग्राम योजना’मध्ये औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आडगाव भोसले (ता. कन्नड) आणि राज्यसभेचे सदस्य खासदार राजकुमार धूत यांनी वेरूळला पसंती दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेच्या लोकसंख्येच्या निकषात दोन्ही गावे बसत नाहीत, त्यामुळे ही गावे बदलावीत, की खासदाराच्या आग्रहानुसार कायम ठेवावीत, यावर पुढील तीन-चार दिवसांत प्रशासन निर्णय घेणारआहे. केंद्र सरकारच्या सचिवांनी गुरुवारी यासंदर्भात व्हीसी घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या योजनेसंदर्भात त्वरित पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खा. खैरे यांनी आडगाव भोसले या गावाला, तर खा. धूत यांनी वेरूळला मॉडेल रूप देण्याचे ठरविले आहे.संबंधित लोकप्रतिनिधींनी या गावांची नावे प्रशासनाला सुचविली आहेत. आडगाव भोसले हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते, तर वेरूळ हे जागतिक पर्यटन स्थळ आहे. आडगाव भोसले या गावाची लोकसंख्या तीन हजारांहून कमी, तर वेरूळची लोकसंख्या ७ हजारांहून अधिक आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, केंद्रीय स्तरावरून मिळालेल्या सूचनेनुसार खासदारांना ही गावे २०१६ पर्यंत मॉडेल करावी लागणार आहेत. त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी आणखी एका गावाची निवड त्यांनी करायची आहे.पुढील तीन-चार दिवसांत ही गावे निश्चित केली जाणार आहेत. योजनेच्या निकषात बसणारी १२७ गावे (ग्रामपंचायत) जिल्ह्यातआहेत.