शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर जलप्रलयाचा फटका ट्रॅव्हल उद्योगाला

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : काश्मीरमध्ये जलप्रलयानंतर अजूनही लाखो पर्यटक अडकून पडले आहेत.

औरंगाबाद : काश्मीरमध्ये जलप्रलयानंतर अजूनही लाखो पर्यटक अडकून पडले आहेत. अडकलेले पर्यटक सुखरूप पोहोचावेत यासाठी शासकीय, निमशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादेतील ट्रॅव्हल उद्योगाला जलप्रलयाचा मोठा फटका बसला आहे.औरंगाबादहून काश्मीरला मोठ्या संख्येने पर्यटक जातात. काही भाविकही वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जात असतात. पर्यटक आणि भाविकांमुळे औरंगाबादेतील ट्रॅव्हल उद्योगाला मोठा आर्थिक हातभार लागत असतो. वर्षभरात एका ट्रॅव्हल एजन्सीकडून किमान ३०० हून अधिक नागरिक ये-जा करतात.शहरात काश्मीर आणि इतर पर्यटनस्थळांना जाण्यासाठी सुमारे २५ पेक्षा अधिक ट्रॅव्हल एजन्सी आहेत. अनेक एजन्सीधारक मुंबई, दिल्ली येथील मोठ्या एजन्सीधारकांशी कनेक्ट आहेत. वर्षभरात पाच हजारांहून अधिक भाविक, पर्यटक काश्मीरला जात असतात. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काश्मीरमधील अनेक शहरे पाण्यात बुडाली आहेत. पाणीपातळी कमी होण्यास तयार नाही. लाखो पर्यटक विविध हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत.औरंगाबादेतील सहा पर्यटक बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंबीय आणि ट्रॅव्हल कंपन्या चिंतेत आहेत. या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने प्रशासनही चिंतातुर आहे. पावसाळ्यात किंवा बर्फवृष्टी होणाऱ्या दिवसांमध्ये काश्मीरला जाऊ नये, असा सल्ला ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांना देतात. काही पर्यटक हा सल्ला न ऐकता स्वत:च्या रिस्कवर जातात. काश्मीरमध्ये एप्रिल ते जून चांगले हवामान असते. या दिवसात जायला अजिबात हरकत नसते. हनीमुनसाठी अनेक जोडपे काश्मीरलाच प्राधान्य देतात. कुटुंबासह या दिवसांमध्ये जाणे योग्य असल्याचे ट्रॅव्हल कंपन्या सांगतात.जम्मू-काश्मीर बँकऔरंगाबादेत जालना रोडवरील कुशलनगर येथे जम्मू- काश्मीर बँकेची शाखा आहे. या शाखेत काश्मीरशी आर्थिक व्यवहार करणारे ग्राहकच नाहीत. त्यामुळे बँकेच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मॅनेजर सिन्हा यांनी सांगितले.