शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कारगिल स्मृतिवनाचा करार

By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : मनपाच्या गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर साडेतीन कोटी रुपये खर्चून कारगिल स्मृतिवन व उद्यान विकसित करण्याची संचिका खा. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधाला डावलून भाजपाने मंजूर करून घेतली

औरंगाबाद : मनपाच्या गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर साडेतीन कोटी रुपये खर्चून कारगिल स्मृतिवन व उद्यान विकसित करण्याची संचिका खा. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधाला डावलून भाजपाने मंजूर करून घेतली आहे. जिल्हा सैनिक बोर्ड व पालिकेत करार झाला असून, आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्या जागेवर राज्य सैनिक मंडळाने राज्यपालांच्या नावाने नामफलक लावला. भाजपाने शिवसेनेला या प्रकरणात जोरदार हबाडा दिला आहे. मनपा उपायुक्त आशिष पवार, उपअभियंता एस.पी. खन्ना व राज्यपालांतर्फे शिवकुमार कहाळेकर यांनी ४ सप्टेंबर रोजी करार केला आहे. करारात वेगवेगळ्या १२ अटी व शर्तींचा समावेश आहे. त्या उद्यानाच्या कामावरून शिवसेना- भाजपामध्ये ‘कायद्या’चा कलह निर्माण झालेला असताना आज नामफलक लागला आहे. सेनेने या प्रकरणात तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. आयुक्तांनी बदली होण्यापूर्वी त्या उद्यानाच्या जागेचा करार केल्यामुळे बुधवारी सैनिक बोर्डाने जागेचा ताबा घेतला. या प्रकरणात युतीमध्ये राजकीय खटके उडणार असून, भाजपाने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना शिवसेनेत निर्माण झाली आहे. महापौर कला ओझा यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली नाही. असा आहे विरोधजिल्हा सैनिक बोर्डाकडे जागा देण्याचा प्रस्ताव सभेऐवजी स्थायी समितीने मंजूर केल्यामुळे युतीमध्ये आठ महिन्यांपासून राजकारण पेटले आहे. ८ एकर इतके त्या जागेचे क्षेत्रफळ आहे. ती मनपाच्या नावावर नाही. टीडीआरचा मुद्दाही सेनेने त्या प्रकरणात उपस्थित केला होता.