शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

करबुडव्यांनी महापालिकेला घुमविले

By admin | Updated: August 13, 2014 01:43 IST

औरंगाबाद : शहरातील ३६३ महाठकांनी पालिकेला बँक खात्यात रक्कम नसताना मालमत्ता करापोटी धनादेश देऊन घुमविल्याची माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : शहरातील ३६३ महाठकांनी पालिकेला बँक खात्यात रक्कम नसताना मालमत्ता करापोटी धनादेश देऊन घुमविल्याची माहिती पुढे आली आहे. या करबुडव्यांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत मनपाने मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीतून जवळपास ९५ कोटी रुपयांचा कर मिळविला. या मोहिमेत ५० टक्के कर धनादेशातून जमा झालेला आहे. त्यातील १ कोटी रुपयांचे धनादेश बँकेत रक्कम नसल्यामुळे बाऊन्स झाले. १ एप्रिलपासून आजवर पाच महिन्यांत मनपाने वारंवार नोटिसा देऊन संबंधित करदात्यांनी पालिकेला कर दिला नाही. मालमत्ता सील करण्याची तंबी दिल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी कर दिला. त्यातून पालिकेला ५० लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळाले. अजून ५० लाख रुपयांचे न वटलेले धनादेश पालिकेत पडून आहेत. ते न वटल्यास १६ पासून मालमत्ता सील करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. असे करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले.प्रभागनिहाय बाऊन्स धनादेश प्रभागधनादेशवटलेबाकीअ१८0३१५ब७५६५१०क३०२१0९ड६६१३५३ई६७४९२३फ१०७७७३०एकूण३६३२२८१४०२२८ धनादेश वटलेसहा प्रभागांपैकी २२८ धनादेश वटले असून पालिकेला ५० लाखांचा कर मिळाल्याचा दावा करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी केला. १४० धनादेश बाऊन्स झालेले आहेत. फ प्रभागात सर्वाधिक १०७ धनादेश बाऊन्स झाले होते. धनादेश १६ तारखेपर्यंत वटले नाही तर संबंधितांच्या मालमत्ता सील करण्याचा इशारा झनझन यांनी दिला.