शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी अजूनही मृतसाठ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:09 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे. विभागातील अकरापैकी सहा प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ३०३ दलघमी म्हणजे सुमारे १०.७० टीएमसी पाणी आले आहे. मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी धरणात सर्वाधिक १४८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तरीसुद्धा जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. जायकवाडी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १२५ दलघमी म्हणजे ४.४ टीएमसी पाण्याची गरज आहे.भीषण दुष्काळामुळे यंदा मे महिन्यापूर्वीच मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे हजारो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र, १ जुलैपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात कोरड्या जलसाठ्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पंधरवड्यातील मराठवाड्यात मोठ्या धरणांमध्ये एकूण ३०३ दलघमी पाणी आले आहे. निम्न दुधना धरणात ३१ दलघमी, येलदरी धरणात ३२ दलघमी, सिद्धेश्वर धरणात ४० दलघमी, माजलगाव धरणात ५.५० दलघमी, पेनगंगा धरणात ४७ दलघमी पाणी आले आहे. तर जायकवाडी धरणात सर्वाधिक १४८ दलघमी पाणी आले आहे. मात्र, जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. यंदा जायकवाडीतील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. आतापर्यंत मृतसाठ्यातून २७३ दलघमी पाणी उपसा झाला आहे. त्या तुलनेत गेल्या पंधरा दिवसांत धरणात १४८ दलघमीची आवक झाल्यामुळे आता जायकवाडी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १२५ दलघमीची आवश्यकता आहे. मराठवाड्यात सध्या अकरापैकी केवळ तीन धरणांमध्ये जिवंत साठा आहे. विष्णूपुरी धरण ८८ टक्के भरले आहे. त्यापाठोपाठ निम्न दुधना धरणात १७ टक्के साठा झाला आहे. तर पेनगंगा धरणात ४.६८ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्येही गेल्या पंधरा दिवसांत पाण्याची बऱ्यापैकी आवक झाल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.