जटाशंकर मंदिराकडे भाविकांचा ओढा

By Admin | Updated: July 28, 2014 01:01 IST2014-07-27T23:36:41+5:302014-07-28T01:01:28+5:30

डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Jathasankar temple devotees devote | जटाशंकर मंदिराकडे भाविकांचा ओढा

जटाशंकर मंदिराकडे भाविकांचा ओढा

डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यानिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार असून पहिल्या सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानने भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे.
साधारणत: १५ हजार लोकसंख्येच्या गावातील या देवस्थानला शासनाने पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा दिला आहे. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर परिसरात सुविधाही पुरविण्यात येत आहेत. वर्षभरात श्रावण महिना व महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो. २८ जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार येत असल्याने या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. शिवाय मंदिरामध्ये सकाळी ५ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. श्री जटाशंकर मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये दररोज अभिषेक करण्यात येतो; परंतु मूर्तीची झीज होऊ नये म्हणून शाश्वत अभिषेक करण्यात येत आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी गावकऱ्यांच्या वतीने भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली जाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Jathasankar temple devotees devote