शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

आज दुमदुमणार जयभीमचा नारा

By admin | Updated: April 14, 2016 01:20 IST

औरंगाबाद : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत.

औरंगाबाद : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. शहरात अपूर्व उत्साह दिसून येत असून, उद्या १४ एप्रिल रोजी अभिवादन, वाहन रॅली, मुख्य मिरवणुकीसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी शहर सजले आहे. ठिकठिकाणच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांजवळ आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घराघरांवर निळे ध्वज उभारण्यात आले आहेत. यंदा प्रथमच निळ्या रंगाचे आकाशकंदिल लावण्यात आले आहेत. जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईने शहर उजाळून निघाले होते. बाजारपेठेतही सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी आज शहरवासीयांची झुंबड उडाली होती. कापड बाजारात नवीन कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांवर व रिक्षांवर निळे ध्वज लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्या सकाळी कॉलनी-कॉलनीमध्ये आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक कॉलनीत आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. कॉलनीच्या मैदानात मंडप टाकण्यात आले आहेत. भडकलगेट परिसरातील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा परिसर रोषणाईने उजाळून निघाला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने (पान २ वर)