शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

आसरडोह योजनेचा चौकशी अहवाल सादर

By admin | Updated: August 15, 2014 01:35 IST

बीड : धारूर तालुक्यातील आसरडोह येथील वीसगाव आठरा तांडे पाणीपुरवठा योजनेचा चौकशी अहवाल बुधवारी जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवांकडे सादर झाला आहे.

बीड : धारूर तालुक्यातील आसरडोह येथील वीसगाव आठरा तांडे पाणीपुरवठा योजनेचा चौकशी अहवाल बुधवारी जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवांकडे सादर झाला आहे. चौकशीत अनियमितता आढळून आली असून कारवाईकडे लक्ष वेधले आहे.आसरडोह येथे २२ कोटी रुपये खर्च करुन प्रादेशिक पाणी योजना राबविण्यात आली होती; परंतु योजनेचे काम निकृष्ट झाल्याने योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकली नाही. आजही परिसरातील गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेच्या कामातील अनियमिततेच्या चौकशीची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता पथकाचे अधीक्षक अभियंता के. डी. खोसे यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने वर्षभरापूर्वी चौकशी केली होती. त्याचा अहवाल मात्र सादर केला नव्हता. अखेर हा अहवाल सदस्य सचिव सोनिया सेठी यांच्यापुढे गेला आहे. या चौकशी अहवालात अनियमिता आढळल्याचे नमूद असून दोषींवर कारवाईची शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.नंतर फोन करागुणवत्ता नियंत्रणचे अधीक्षक अभियंता के. डी. खोसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, अहवाल सादर केला आहे; पण अहवालात काय आहे? हे जाणून घ्यायचे असेल तर शनिवारी फोन करा. मला आता वेळ नाही असे सांगून त्यांनी फोन ठेवला. (प्रतिनिधी)