शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

१७ फूट उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

उमरगा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात येथील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या १७ फुट उंचीच्या गणरायाची स्थापना उत्साहात करण्यात आली असून,

उमरगा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात येथील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या १७ फुट उंचीच्या गणरायाची स्थापना उत्साहात करण्यात आली असून, शहराच्या गणेश उत्सवाच्या इतिहासात या मंडळाने १७ व्या वर्षात पदार्पण केल्याने १७ फुट उंचीच्या हनुमान उड्डाण गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील गणेश भक्तांची झुंबड उडाली आहे.येथील आरोग्य नगरमधील गणराज गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेला १६ वर्ष पूर्ण होवून या मंडळाने १७ व्या वर्षात पदार्पण केले. १७ व्या वर्षाच्या पदार्पणामुळे या मंडळाच्या वतीने खास सोलापूर येथून गजराजाच्या सोंडेवर पाय ठेवून हनुमान उड्डाण करीत असल्याची प्रेक्षणीय गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. सोलापूर येथील मूर्तीकार दिपक वाईटला या मूर्तीकारांनी या मूर्तीला आकार दिला आहे.शुक्रवारी सायंकाळी १७ फुट उंचीच्या मूर्तीचे शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवून श्रीं च्या आगमनाप्रित्यर्थ १७ तोफांची सलामी देण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात श्रीं च्या भव्य मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. क्रेनच्या सहाय्याने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापूर येथील श्रीराम फायनान्सचे व्यवस्थापक संतोष पाटील व वर्षाराणी पाटील यांच्या हस्ते श्रीं ची स्थापना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बालाजी पाटील, उपाध्यक्ष गोपाळ जाधव, सचिव शरद पवार, कोषाध्यक्ष नागराज तेलंग, प्रताप मुगळे, बाळू माळी, लक्ष्मण खरटमोल, संगमेश्वर भडोळे, जगदीश सुरवसे, मनोज पाटील, मनोज जाधव, संदीप पांचाळ, रंगेश मुरमे आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शहराच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच १७ फुट उंचीची हनुमान उड्डाण गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)