शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी ‘बीडीओं’ना मारहाण

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

कळंब : तालुक्यातील एकुरका येथील एका व्यक्तीने सीईओंच्या निर्देशानुसार रोजगार सेवकांच्या कामांसंदर्भात विचारणा करीत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना चक्क

कळंब : तालुक्यातील एकुरका येथील एका व्यक्तीने सीईओंच्या निर्देशानुसार रोजगार सेवकांच्या कामांसंदर्भात विचारणा करीत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना चक्क मारहाण केल्याची घटना बुधवारी येथील पंचायत समितीमध्ये घडली. याप्ररणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. कळंब पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शांता सुरेवाड या सध्या वैद्यकीय रजेवर असल्यामुळे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन हरिदास राऊत यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार आहे. बुधवारी राऊत हे कार्यालयीन कामकाजासाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उस्मानाबादकडे जाण्याच्या तयारीत असतानाच एकुरका येथील दीपक भिसे तेथे दाखल झाले. त्यांनी राऊत यांना कार्यालयाच्या पोर्चमध्ये अडवून रोजगार सेवकांच्या कार्यवाही बाबत विचारणा करुन शिवीगाळ केली तसेच राऊत यांना चापट लगावली. या प्रकारामुळे कळंब पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली. घटना घडताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले काम बंद केले. यानंतर सर्व कर्मचारी एकत्र येवून या प्रकाराचा निषेध करत होते. दरम्यान, याप्रकरणी प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात दीपक भिसे यांच्या विरूद्ध भादंवि कलम ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ सुनील सावंत करत आहेत. (वार्ताहर)